Mumbai Coastal Road Helipad Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Helipad : कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅड सुरु होणार; वाचा सविस्तर

Mumbai Coastal Road Helipad : मुंबईच्या कोस्टल रोडवर वरळी येथे पहिले सार्वजनिक हेलिपॅड सुरू होणार आहे. आपत्कालीन रुग्णसेवा, सुरक्षा आणि व्हीआयपी प्रवासासाठी हे हेलिपॅड उपयुक्त ठरणार आहे.

Alisha Khedekar

  • वरळी येथे मुंबईतील पहिले सार्वजनिक हेलिपॅड

  • कोस्टल रोडवर हेलिकॉप्टर लँडिंगचा नवा पर्याय

  • आपत्कालीन रुग्णसेवेसाठी प्राधान्य वापर

  • सुरक्षा दल आणि व्हीआयपी प्रवासासाठी लाभदायक

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅड सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी वरळी येथे उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक हेलिपॅडचे संचालन आणि देखभालीसाठी महापालिकेने कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

वरळी येथील डेअरीसमोर समुद्रात सुमारे १२० मीटर आत असलेल्या जेट्टीवर हे अत्याधुनिक हेलिपॅड उभारण्यात आले आहे. हे हेलिपॅड दक्षिण मुंबईतील पहिलेच सरकारी मालकीचे सार्वजनिक हेलिपॅड असणार आहे. आतापर्यंत दक्षिण मुंबईत हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी राजभवन किंवा महालक्ष्मी रेसकोर्स या दोनच जागांचा वापर केला जात होता.

मात्र आता कोस्टल रोडमुळे प्रवाशांसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. हेलिपॅड चालविण्याचे कंत्राट सुरुवातीला पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंत्राटदाराला पालिकेला ठराविक मासिक परवाना शुल्क आणि प्रत्येक लँडिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा द्यावा लागेल, असे पालिकेने सांगितले.

या हेलिपॅडचं वैशिष्ट्ये म्हणजे, आपत्कालीन काळात रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी या हेलिपॅडचा वापर प्राधान्याने केला जाणार आहे. त्यामुळे गंभीर असलेल्या रुग्णांचे प्राण बचावले जातील . तसेच किनारपट्टीची सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कोस्टल पोलिस व सुरक्षा दलांना हे केंद्र फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी महालक्ष्मी रेसकोर्सवरील ताण देखील कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Funeral: सुनेत्रा वहिनींना हात देत सुप्रिया सुळेंनी सावरलं, अजितदादांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : "तो माझा..."; बिग बॉसच्या घराबाहेर पडताच लावणी क्वीनने पलटी मारली, राधा मुंबईकरने बॉयफ्रेंडविषयी केला मोठा खुलासा

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर काहीच वेळात होणार अंत्यसंस्कार

Gold Rate Today : सोन्याच्या दरवाढीचा स्फोट, एका दिवसात प्रति तोळा ११,७७० रुपयांची वाढ; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT