First Look: Mumbai’s Automatic Door Local Train Prototype Unveiled at Kurla Carshed Viral Video
मुंबई/पुणे

Mumbai Local : ऑटोमॅटिक दरवाजा असणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार, पहिला व्हिडिओ समोर

Central Railway local train upgrade with auto doors : मुंबईमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे असलेली पहिली लोकल डिसेंबर २०२५ मध्ये धावणार आहे. दोन लोकल गाड्यांवर चाचणी सुरू होणार आहे. पुढील काही वर्षांमध्ये मुंबईतील सर्व लोकलमध्ये ही सुविधा असेल.

Namdeo Kumbhar

  • डिसेंबर २०२५ पासून ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या लोकलची चाचणी सुरू होणार

  • मध्य रेल्वेकडून कुर्ला कारशेडमध्ये प्रोटोटाइप तयार झाला

  • अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्वाचे पाऊल

  • भविष्यात मुंबईतील सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या होण्याची शक्यता आहे.

Mumbai local train with automatic doors launch date : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दरवाजांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. गर्दीच्या वेळी लोक लोकलच्या दारात उभे राहून जीवघेणा प्रवास करतात. त्यामुळे अनेक दुर्घटना होतात अन् लोकांचा बळी जातो. मुंब्रा येथे नुकतीच झालेली घटना सर्वांना सुन्न करणारी होती.  प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू किंवा जखमी होण्याच्या घटना कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल गाड्या आणण्याचा निर्णय घेतलाय. यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यामध्ये मुंबईकरांच्या सेवेत पहिली ऑटोमॅटिक दरवाजे असणारी लोकल धावणार आहे. सुरूवातील दोन लोकलची चाचपणी केली जाईल. त्यांतर सर्व लोक प्रोटोटाइप होतील, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांना लोकल धावत असताना दरवाजातून बाहेर पडणे किंवा आत येणे अशक्य होईल, ज्यामुळे सुरक्षितता अधिक वाढणार आहे.

ऑटोमॅटिक दरवाजे असणाऱ्या लोकल निर्मिती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. प्रोटोटाइप यशस्वी झाल्यानंतर मुंबईकरांसाठी २३८ लोकल लोकलसाठी निविदा काढण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईमधील सर्व लोकल ऑटोमॅटिक होतील, असा कयास बांधला जात आहे. मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर मुंबई लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. त्यानुसार, कुर्ला कारशेड येथे एक डब्बाही तयार करण्यात आला. सध्य हा डब्बा वापरात येणार नाही, रेल्वेकडून त्यावर अधिक काम केले जात आहे. संपूर्ण लोकलच तशा पद्धतीने तयार करण्यात येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

सर्व लोकल १५ डब्ब्याच्या होणार -

ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल १५ डब्ब्यांची असेल. कारण, प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजतेय. भविष्यात मुंबईमधील सर्व लोकल या १५ डब्ब्याच्या करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून करण्यात येत आहे. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे काम करत आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये स्वयंचलित दरवाजे असणाऱ्या दोन लोकल गाड्यांवर चाचणी सुरू होणार आहे. ही चाचपणी यशस्वी झाल्यास सर्व गाड्यांमध्ये हे तंत्रज्ञान लागू होईल. यामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनला आधुनिक आणि सुरक्षित स्वरूप प्राप्त होईल, ज्याचा लाखो प्रवाशांना फायदा होईल.

प्रोटोटाइप तयार, इतर डब्ब्यावर काम सुरू -

ऑटोमॅटिक दरवाजे असणारी लोकल तयार करण्याचे काम रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पहिला कोच (प्रोटोटाइप) तयार झाला आहे, त्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. हा कोच सध्या तांत्रिक चाचण्यांसाठी वापरला जात आहे. यामध्ये दरवाजे स्वयंचलितपणे बंद होण्याची यंत्रणा, सेन्सर्स आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये तपासली जात आहेत.

चाचणी प्रक्रियेत दरवाज्यांची कार्यक्षमता, प्रवाशांच्या गर्दीतील व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत दरवाजे उघडण्याची यंत्रणा आणि तांत्रिक स्थिरता यांचा समावेश आहे. यशस्वी चाचणीनंतर सर्व लोकल गाड्यांमध्ये हे तंत्रज्ञान लागू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया राबवली जाईल.

ऑटोमॅटिक दरवाजे असलेली पहिली लोकल मुंबईमध्ये कधी धावणार?

डिसेंबर २०२५ मध्ये दोन लोकल गाड्यांवर चाचणी सुरू होणार आहे. चाचणी यशस्वी झाली तर त्यानंतर पुढील काही दिवसांत मुंबईमधील सर्व लोकल ऑटोमॅटिक दरवाजे असणाऱ्या असतील.

लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाज्यांमुळे काय फायदे होणार आहेत?

अपघात कमी होतील, दरवाजातून पडण्याचे प्रकार थांबतील, आणि प्रवासी सुरक्षित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik To Amravati: नाशिक ते अमरावती जाण्यासाठी कोणता मार्ग उत्तम? वाचा सोपे टिप्स आणि ट्रिक्स

७५ वर्ष पूर्ण, आता मोदी रिटायर होत आहेत? एनडीएकडून मोदींचं सत्कार का झाला? बड्या खासदारानं सांगितलं..

Maharashtra Live News Update : पुणे पोलिस आयुक्तालयात गणेश मंडळांची बैठक सुरू

Khalid Ka Shivaji Controversy : पुण्यात 'खालिद का शिवाजी' वादाच्या भोवऱ्यात, हिंदू महासंघ आक्रमक, वाचा नेमकं कारण काय?

Hindustani Bhau Viral Video: माधुरी हत्तीण वादात हिंदुस्थानी भाऊची उडी; कोल्हापुरातील आंदोलकांना केली शिवीगाळ, व्हिडिओ

SCROLL FOR NEXT