Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Accident News : मोठी बातमी! मुंबईहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात; गर्भवती महिलेसह 6 प्रवाशी जखमी

Accident News : या अपघातात 5 ते 6 प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. काल (शनिवारी) रात्री 11 च्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच यामध्ये एका गर्भवती महिलेला देखील दुखापत झाली असून तिच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Bavdhan Bus Accident)

मुंबई येथून बेंगलोरला निघालेली शर्मा ट्रॅव्हलची खासगी प्रवासी बस बावधन जवळ पुलाचे कठडे तोडून सर्व्हिस रस्त्यावर खाली कोसळली. यामध्ये एक गरोदर महिला व तीचे एक लहान बाळ जखमी झाले असून त्यांना नजिकच्या रूग्णालयात दाखल केल्याचे समजले आहे. चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं प्रवाशी म्हणत आहेत.

एका प्रवाशाने सांगितल्यानुसार, चालक बस चालवत असताना मध्येच सिगारेट पित होता. त्यामुळे अचानक त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बसचा भीषण अपघात झाला, असं काही प्रवाशी म्हणत आहेत.

शनिवारी रात्री 8 वाजता ही स्लीपर कोच बस मुंबईहून बेंगलोरला जाण्यास निघाली होती. बावधन येथील सर्व्हिस रोडवर या बसचा अपघात झाला. बस थेट रस्त्यावर पलटी झाली.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात बनवा चटपटीत टोमॅटो चीज चटणी पकोडा; एकदा खाल्लं की खातच राहाल|Tomato Cheese Chutney Pakoda

Chanakya Niti: राग संपवू नका, त्यावर नियंत्रण ठेवा; चाणक्यांनी यश मिळवण्यासाठी दिला मोलाचा सल्ला

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Paneer Puff Recipe: घरच्या घरी बनवा खुसखुशीत पनीर पफ; चहासोबत लागेल भन्नाट चव

महावितरणचा हलगर्जीपणा! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT