Accident News: रस्‍त्‍यावर उभ्‍या कालिपिलीला दुधाच्या गाडीची जोरदार धडक; सात व्यक्ती गंभीर जखमी

रस्‍त्‍यावर उभ्‍या कालिपिलीला दुधाच्या गाडीची जोरदार धडक; सात व्यक्ती गंभीर जखमी
Accident News
Accident NewsSaam tv

लातूर : लातूर– चाकुर महामार्गावर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अपघात (Accident) झाला. चाकुर तालुक्यातील महळांग्रा येथे जागेवर थांबलेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी गाडीला भरघाव (Latur News) वेगाने पाठीमागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सात व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)

Accident News
Pandharpur News: सात हजार एकरावरील द्राक्षांना फटका; पंढरपूर तालुक्यात अवकाळीचा दणका

आज सकाळी दुधाची वाहतूक करणाऱ्या गाडीने महळांग्रा पाटीजवळ प्रवासी वाहनाला जोरदार धडक दिल्याने सदरील अपघात झाला आहे. यात सात प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्त ठिकाण

महळांग्रा गावाजवळील रस्ता हा अपघातग्रस्त ठिकाण असून सरपंच आणि गावकऱ्यांनी अनेकदा राष्ट्रीय महामार्ग विभागाला याबाबत पर्यायी कायमस्वरूपी उपाययोजना करावी यासाठी निवेदने दिली आहे. काही दिवसापूर्वी दोन व्यक्ती अपघातग्रस्त होवून उपचार घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com