Mumbai Train
Mumbai Train Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Train: लाइफलाइनमध्ये गुदमरतोय मुंबईकरांचा श्वास; कधी सुळरळीत होणार हा जीवघेणा प्रवास?

Ruchika Jadhav

Mumbai Train: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मात्र आता लाइफलाइनचा हा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच थरारक प्रवासाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Mumbai Train News)

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभी आहे. ट्रेन येताच सर्व प्रवाशी तिच्या दिशेने पळू लागतात. यात ट्रेन आतमध्ये तुडूंब भरलेली आहे. मात्र तरी देखील काही व्यक्ती या ट्रेनच्या दरवाजामध्ये लटकले आहेत. आता हे असं दृश्य मुंबईत रोजच पाहायला मिळतं. रेल्वेने प्रवास करताना दरवाजात उभे राहू नका असे सांगणाऱ्या महिलेचा आवाज देखील एवढ्या गर्दीत ऐकू येत नाही.

स्वत:च्या जीवाशी खेळत रोजच मुंबईकरांना प्रवास करावा लागतो. मुंबईच्या मध्य रेल्वेमध्ये असलेल्या स्थानकांत ट्रेनची संख्या कमी आणि नागरिकांची संख्या जास्त असं चित्र निर्माण झालं आहे. अशात वाढती लोकसंख्या पाहता रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे स्थानाकातील ठाणे स्थानकापासून कर्जत आणि कसारा या मार्गांवर लोकल सेवा वाढवण्याची मागणी होत आहे.

रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जात असली तरी तिच्यामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत, असे प्रवाशी हमखास सांगतात. मुंबईमध्ये सकाळी चाकरमानी रोजच तारेवरची कसत करतात. धावत पळत स्टेशनला पोहचल्यावर अनेकदा ट्रेन उशिरा येते याने देखील गर्दी जास्त वाढते. अशात कामावरव तर वेळेवर पोहचायचे आहे नाही तर पगार कापला जाईल याच भीतीने प्रत्येक जण कितीही गर्दी असली तरी धावत पळत ट्रेन पकडतो. मात्र मुंबईची लाईफलाईन खऱ्याअर्थाने लाईफलाईन म्हणून केव्हा काम करेल याची वाट मुंबईकर पाहत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raashii Khanna : क्या खूब लगती है, बडी सुंदर दिखती हो...

Today's Marathi News Live : रवींद्र वायकर यांच्यासाठी महायुतीचे उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन

SRH vs RR, IPL 2024: हैदराबाद- राजस्थानमध्ये कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

Parbhani News : विहिरीचे खोदकाम जेसीबीने; रोहयोच्या संतप्त मजुरांनी पंचायत समितीतच प्राशन केले किटक नाशक

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ, अटकेसाठी ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT