Mumbai Heavy Rain Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Rains : मुंबईत पावसाचे थैमान, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, पुढील २४ तासांसाठी धोक्याचा इशारा

Mumbai heavy rainfall latest news : मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पालघर, रायगडसह अनेक भागांत पूरस्थिती, दरड कोसळणे आणि वाहतूक विस्कळीत झाल्याची ताजी माहिती वाचा.

Namdeo Kumbhar

मुंबई, उपनगर आणि आसपासच्या परिसरात मागील ३ दिवसांपासून रेकॉर्डब्रेक पाऊस झालाय. या वादळी पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे, पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. हवामान विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईत 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधानसभेत याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई, पालघर आणि रायगडमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांत विक्रमी पाऊस झाला आहे. यामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मानखुर्द परिसरात चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर गेल्या दोन दिवसांत मुंबईत झाड कोसळून झालेल्या घटनांमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत एक झाड धावत्या स्कूल बसवर पडल्याने ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कुर्लामध्येही एका व्यक्तीचा पावसामुळे मृत्यू झाला. ठाणे शहरातही झाडे पडण्याच्या २०० हून अधिक घटना घडल्या असून त्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पुढील २४ ते ४८ तासांसाठी रायगड, पुणे जिल्ह्यातील घाट परिसर, नाशिक आणि पालघरसाठी पुन्हा रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोकण प्रदेशात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्कालीन पथकांनी तत्परता दाखवत पुराचा धोका असलेल्या भागातून सुमारे २०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले (evacuate) आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाकडून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मुंबईची तुंबापुरी

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील हिंदमाता, सायन, कुलाबा आणि अंधेरी सबवे यांसारख्या सखल भागांमध्ये कंबरभर पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे पंप तैनात करण्यात आले असले, तरी पावसाचा वेग जास्त असल्याने पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत आहे. हवामान खात्याने पुढील काही तास नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत गेल्या ५ दिवसांत अभूतपूर्व पाऊस झाला आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीच्या ९०% पेक्षा जास्त पाऊस अवघ्या ५ दिवसांत झाला आहे. कुलाबा भागात गेल्या ५० वर्षांतील सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई-पुणे वाहतूक पूर्णपणे ठप्प (दरड कोसळली)

मुसळधार पावसामुळे खंडाळा घाटाजवळ एक्सप्रेसवे आणि जुन्या हायवेवर मोठी दरड (Landslide) कोसळली आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच कर्जत-लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दगड आणि माती आल्यामुळे मध्य रेल्वेने मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या सर्व ट्रेन्स (उदा. सिंहगड, डेक्कन क्वीन) रद्द केल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरही सुकेळी घाटात ३ फूट पाणी साचल्याने किलोमीटर लांब ट्रॅफिक जॅम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rinku Rajguru: साधी साडी, गोज हसू...; रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी वेधलं लक्ष; चाहते म्हणाले, 'आईची कार्बन कॉपी'

Election 2026 : गुजरातसह ३ राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर, आयोगाने वेळापत्रक केलं जाहीर

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये मुसळधार पावसाचा कहर! झांजरोळी धरणाचा भाग वाहून गेला, ग्रामस्थांमध्ये भीती

गर्भ ठेवायचा की गर्भपात करायचा? निर्णय घेण्याचा अधिकार आईला, पित्याला नाही: हायकोर्ट

Satara: ९ वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शाळेची तयारी करताना जागीच प्राण सोडले

SCROLL FOR NEXT