Mumbai Central Bellasis Bridge Work Complete Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Bellasis Bridge : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई सेंट्रलमधील 'तो' ब्रिज सोमवारी होणार खुला, वाहतूककोंडी होणार कमी

Mumbai Central Bellasis Bridge Work Complete : ताडदेव-नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस पूल २६ जानेवारीपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या पुलाचे काम वेळेआधी पूर्ण झाले आहे.

Alisha Khedekar

  • बेलासिस पूल २६ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला

  • अवघ्या १५ महिन्यांत पूल बांधकाम पूर्ण

  • महापालिका आणि मध्य रेल्वेचा यशस्वी समन्वय

  • मुंबई सेंट्रल परिसरातील वाहतूक कोंडीला दिलासा

मुंबईकरांसाठी खुशखबर! ताडदेव-नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस पूल प्रवाशांसाठी सज्ज झाला आहे. या पुलाचे काम अवघ्या १५ महिने आणि सहा दिवसांत पूर्ण झाला आहे. निविदेच्या अटीशर्तींनुसार या पुलाच्या कामासाठी अजून चार महिन्यांची मुदत बाकी आहे. तरीही या पुलाचे काम वेळेआधी पूर्ण झाले असल्याचं म्हटलं जात आहे. हा पूल येत्या २६ जानेवारी रोजी प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्‍थानकाजवळ असलेल्या ब्रिटीशकालीन बेलासिस उड्डाणपूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर त्‍याच्‍या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने हाती घेतले. बांधकामाचे कार्यादेक्ष सप्टेंबर, २०२४ मध्ये देण्यात आले. तर १ ऑक्टोबर २०२४ ला प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली.

महापालिकेचा पूल विभाग आणि रेल्‍वे विभागाचे अभियंते पहिल्‍या दिवसापासूनच पुलाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍नशील होते. त्‍यासाठी कामाची विभागणी करून नियोजन करण्‍यात आले. रुळावरील कामे मध्य रेल्वेने, तर गर्डरचे मजबूतीकरण, पुलाच्या पृष्ठभागाची रचना, स्लॅब कास्टिंग, पुलाच्या पोहोच मार्गाची कामे महापालिकेने पूर्ण केली आहेत.

या पुलाच्या कामादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यामध्ये बेस्‍ट वाहिन्‍यांचे स्‍थलांतरण, अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटवून पर्यायी घरांचे वाटप, एका गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत हटविणे, उच्‍च न्‍यायालयासमोरील खटला इत्यादींचा समावेश होता. या आव्हानांवर मात करत, प्रकल्‍प कामकाजास कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता सर्व अभियंत्‍यांनी घेतल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

सर्व कामाची आखणी नियोजनबद्ध केल्‍याने पावसाळ्याच्‍या चार महिन्‍यांच्‍या कालावधीतही काम अविरत सुरू होते. त्‍यामुळे बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्‍यात यश मिळाले असल्याचे पालिकेने सांगितले. दरम्यान आता या पुलाचे काम पूर्ण झाले असून प्रजासत्ताकदिनी म्हणजेच येत्या २६ जानेवारीपासून हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhirendra Shastri: 'जिस दिन तिरंगे में चांद आ गया उस दिन...; धीरेंद्र शास्त्री नेमकं काय म्हणाले?

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भावासह भाजपमध्ये प्रवेश

उमेदवारीसाठी आधी वेट अँड वॉच, निवडणुका होताच ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांना दिली मोठी जबाबदारी|VIDEO

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावर आज सुनावणी झालीच नाही

Skin Care : तुमची त्वचा ड्राय होते? मग ट्राय करा 'या' नॅचरल फेशियल टिप्स

SCROLL FOR NEXT