plane emergency landing Saam tv
मुंबई/पुणे

Plane Emergency Landing : महिला पायलटच्या धाडसाने विमानाचा मोठा अपघात टळला; धैर्याने ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले

mumbai spicejet plane emergency landing : स्पाइसजेटच्या पायलटच्या धाडसाने विमानाचा मोठा अपघात टळला. महिला पायलटने ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले.

Vishal Gangurde

कांडला-मुंबई स्पाइसजेट फ्लाइट SG 2906 ला उड्डाणानंतर चाक गमवण्याचा गंभीर तांत्रिक बिघाड

महिला पायलट पूजा यांनी धैर्य आणि कौशल्य दाखवत विमान सुरक्षित लँड केलं

७५ प्रवासी सुरक्षितपणे टर्मिनलवर पोहोचले

संपूर्ण देशातून पूजा चौधरी यांच्या शौर्याचे आणि व्यावसायिकतेचे जोरदार कौतुक

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Spicejet plane : कांडला ते मुंबई या मार्गावर उड्डाण करणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाला आज एक मोठा धोका टळला. विमानाने कांडला विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर धावपट्टीवर विमानाचे एक बाहेरील चाक (Outer Wheel) पडलेले आढळले. या गंभीर तांत्रिक बिघाडानंतरही महिला पायलट पूजा चौधरी ने अपार धैर्य, कौशल्य आणि शांतता दाखवत ७५ प्रवाशांचा जीव वाचवला आहे.

कांडला (गुजरात) येथून मुंबईकडे येणाऱ्या SG 2906 या स्पाइसजेटच्या फ्लाइटचे उजव्या बाजूचे बाहेरील चाक उड्डाणादरम्यान खाली पडले. ही बाब अत्यंत गंभीर असली तरी, पायलट पूजा चौधरी यांनी आपला धीर न सोडता विमानावर पूर्ण नियंत्रण ठेवले. मुंबई विमानतळावर दुपारी १५.५१ वाजता त्यांनी विमान सुरक्षित उतरवले. लँडिंग इतके सुरळीत होते की विमानाने स्वतःच्या शक्तीवर टर्मिनलपर्यंत प्रवास केला आणि सर्व प्रवाशांनी व्यवस्थितपणे बाहेर पडले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही घटना घडली त्या क्षणी प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण होते, मात्र महिला पायलटने आपले तज्ज्ञत्व, निर्णयक्षमता आणि मनोबल दाखवत परिस्थितीवर मात केली. तिच्या जलद व योग्य निर्णयामुळे संभाव्य दुर्घटनेतून सर्वांना वाचवता आले. ७५ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या या महिला पायलटचे संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे. ही घटना केवळ तांत्रिक बिघाडावर मात करण्याची कथा नाही तर भारतीय महिला वैमानिकांच्या क्षमतेचे आणि धाडसाचे प्रतीक आहे.

या प्रसंगाने महिला पायलट पूजा चौधरी यांचे धैर्य, निर्णयक्षमता आणि व्यावसायिक कौशल्य अधोरेखित झाले आहे. ७५ जणांचा जीव सुरक्षित ठेवल्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही घटना भारतीय महिला वैमानिकांच्या शौर्य व कार्यक्षमतेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून इतिहासात नोंदली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

Maharashtra Politics : 'उदय सामंत शिंदेसेना फोडणार'; ठाकरे गटाच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Friday Horoscope : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना अडचणीवर मात करावी लागणार

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

SCROLL FOR NEXT