Mumbai Special Sessions Court News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबई विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली; शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनावणार होते निकाल

Mumbai Special Sessions Court News : मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडित २५ हजार कोटी रुपयांचा शिखर बँक घोटाळा प्रकरणातील निकाल रोकडे हे सुनावणार होते.

Satish Daud

मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडित २५ हजार कोटी रुपयांचा शिखर बँक घोटाळा प्रकरणातील निकाल रोकडे हे सुनावणार होते. येत्या १२ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, त्याआधीच त्यांची मुंबई सत्र न्यायालयातून दिंडोशी सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे, राहुल रोकडे यांच्यासमोर सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांविरोधातील अनेक खटल्यांची सुनावणी सुरू होती. यात मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबधित महाराष्ट्र सदन घोटाळा, एकनाथ खडसे यांच्यावर आरोप असलेला भोसरी भूखंड घोटाळा तसेच अजित पवार यांच्याशी शिखर बँक घोटाळा यासारख्या खटल्यांचा समावेश होता.

इतकंच नाही तर, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याविरोधातील हनुमान चालिसा पठणचा खटलाही त्यांच्याच कोर्टात सुरू आहे. यातील बहुतांश खटले अंतिम टप्प्यात आले आहेत. मात्र, निकालाआधीच रोकडे यांची बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी न्यायाधीश रोकडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तर राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळ्यात मंत्री छगन भुजबळ यांना अटक वॉरंटचा इशारा दिला होता. आता मुंबई सत्र न्यायालयातून बदली झाल्यानंतर न्यायाधीश रोकडे हे येत्या सोमवारी दिंडोशी येथील पदभार स्वीकारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT