MUMBAI COURT SENTENCES 44 SOMALI PIRATES TO LIFE IMPRISONMENT FOR SHIP HIJACKING AND ATTACK ON INDIAN NAVY Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Court : मुंबई न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय, ४४ समुद्री दरोडेखोरांना जन्मठेपेची शिक्षा; पाहा नेमकं काय घडलं?

Mumbai Special Court : मुंबईच्या विशेष न्यायालयाने जहाजांचे अपहरण, खलाशांना ओलीस ठेवणे आणि भारतीय नौदलावर हल्ला केल्याप्रकरणी ४४ सोमालिया नागरिकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Alisha Khedekar

  • मुंबईच्या विशेष न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

  • ४४ सोमालिया नागरिकांना जन्मठेपेची शिक्षा

  • आरोपींनी जहाजांचे अपहरण करून खलाशांना ओलीस ठेवले

  • भारतीय नौदलाच्या धाडसी कारवाईमुळे सर्व आरोपींना अटक

मुंबईच्या विशेष न्यायालयाने भारताच्या सागरी सुरक्षेबाबत दोन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. जहाजाचे अपहरण तसेच खलाशांना ओलीस ठेवणे आणि भारतीय नौदलावर हल्ला करणे यांसारख्या गंभीर आरोपांच्या अंतर्गत ४४ सोमालिया नागरिकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान सर्व ४४ आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून न्यायालयाने निर्णय देताना भारतीय नौदलाच्या धाडसी कारवाईचे आणि आंतरराष्ट्रीय समुद्री सुरक्षेसाठी केलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

पहिले प्रकरण मार्च २०२४ मध्ये घडले. अदनच्या आखातात ९ सोमालिया नागरिकांनी इराणी ‘एफव्ही अल कंबर’ या मासेमारी जहाजाचे अपहरण केले होते. एके-47 रायफल्स आणि हँड ग्रेनेडने सज्ज असलेल्या सोमालिया नागरिकांनी जहाजावरील कर्मचाऱ्यांना तीन दिवस ओलीस ठेवले. भारतीय नौदलाची आयएनएस त्रिशूल आणि आयएनएस सुमेधा ही युद्धनौका घटनास्थळी पोहोचल्यावर सोमालिया नागरिकांनी गोळीबार केला. त्यानंतर नौदलाने धाडसी कारवाई करून सर्वांना अटक केली.

दुसरे प्रकरण डिसेंबर २०२३ मधील असून, माल्टाच्या ‘एमव्ही रुएन’ या व्यापारी जहाजाचे अपहरण करण्यात आले होते. आयएनएस कोलकाताने कारवाई करत ३५ सोमालिया नागरिकांना पकडले. या सर्वांवर अँटी-पायरेसी कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आला.

दरम्यान न्यायालयाने २० जुलै रोजी या ४४ सोमालिया नागरिकांना जन्म ठेपेची शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान सर्व ४४ आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला होता. त्यांनी न्यायालयाकडे गरिबी आणि कुटुंबीयांची जबाबदारी यांचा दाखला देत शिक्षेत सवलत देण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की आर्थिक परिस्थिती काहीही असली तरी शस्त्रांच्या जोरावर जहाजांवर ताबा मिळवणे, खलाशांना ओलीस ठेवणे आणि खंडणीसाठी त्यांचा वापर करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा कृत्यांबाबत गयावया दाखवता येणार नाही. न्यायालयाच्या या निर्णयाचे समुद्रातील खलाशांनी स्वागत केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या थेट घशात अडकली 'नोज रिंग'; त्यानंतर काय घडलं? VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करण्याची मागणी

Fake Currency : विरारमध्ये ५०० च्या नोटांनी भरलेली कार पकडली; सगळी रक्कम पाहून पोलिसही चक्रावले | VIDEO

Maharashtra Weather : घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’; उर्वरित महाराष्ट्रात श्रावणातील रिमझिम सरी अन् ऊन-सावल्यांचा खेळ

Palghar Earthquake: मध्यरात्री पालघर भूकंपाने हादरले! तासाभरात भूकंपाचे दोन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT