gopal shetty  Saam tv
मुंबई/पुणे

पीडितांना घरे द्याच, अन्यथा भाडे द्या; शुक्ला कंपाउंड तोडक कारवाईवर भाजप नेत्याचा संताप

gopal shetty : शुक्ला कंपाउंड तोडक कारवाईवर भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. पीडितांना घरे द्याच, अन्यथा भाडे द्या, अशी मागणी त्यांनी केली.

Saam Tv

शुक्ला कंपाउंड तोडक कारवाई प्रकरणात मोठी अपडेट

राहुल नार्वेकर यांच्या दालनात काल बैठक

शुक्ला कंपाउंड तोडक कारवाईवर गोपाळ शेट्टी यांचा सवाल

संजय गडदे, साम टीव्ही

दहिसर येथील शुक्ला कंपाउंड तोडक कारवाई प्रकरणासह मुंबईतील संपूर्ण झोपडपट्टी विषयावर विधानभवनात सलग बैठका पार पडल्या. विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सर्व मुद्दे सविस्तर मांडण्यात आले. अवघ्या तीन तासांत चर्चेचे मिनिट्स तयार करून ते व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शिवाय राहुल नार्वेकर यांच्या दालनात देखील काल बैठक झाली यावर राहुल नार्वेकर यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त यांना शुक्ला कंपाउंड स्लम अॅक्ट नुसार संरक्षण असताना कारवाई झालीच कशी असा संतप्त सवाल विचारत पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले अशी माहिती गोपाळ शेट्टी यांनी दिली.

नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत केवळ शुक्ला कंपाउंड नव्हे तर मुंबईतील झोपडपट्टी धोरणावर नार्वेकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. स्लम अ‍ॅक्टअंतर्गत संरक्षण असताना महापालिकेने तोडक कारवाई कशी केली, असा जाब त्यांनी सहाय्यक आयुक्तांना विचारला. मात्र याबाबत डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर संध्या नांदेडकर यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पुढील बैठकीसाठी थेट पालिका आयुक्तांना उपस्थित राहण्याचे निर्देश नार्वेकर यांनी दिले.

या प्रकरणात ‘१९६२ चा पुरावा नाही’ या कारणावरून कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र स्लमचे वैध कागदपत्र सादर करूनही त्याचा कुठेही उल्लेख न केल्याचा गंभीर आरोप गोपाळ शेट्टी यांच्याकडून करण्यात आला. काही जमीनधारकांनी जागा विकत घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. न्यायालयाचा अवमान (काँटेम्प्ट ऑफ कोर्ट) काढण्याचा अधिकार न्यायालयाचा असताना महापालिकेने स्वतःच ती भूमिका का घेतली, असा सवाल उपस्थित झाला.

माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बैठकीत ठाम भूमिका मांडत सांगितले की, ज्यांची घरे तोडली आहेत त्यांना पुन्हा घरे बांधून दिलीच पाहिजेत. जोपर्यंत पर्यायी घरे मिळत नाहीत तोपर्यंत बाधितांना भाडे देण्यात यावे. सरकारची भूमिका लोकांना घरे देण्याची असताना महापालिकेने लोकांची घरे तोडून लोकशाहीची पायमल्ली केली आहे, असा आरोप त्यांनी केला. “माझा मुद्दा पहिल्या दिवसापासून एकच आहे—ज्यांची घरे तोडली आहेत त्यांना घरे मिळालीच पाहिजेत. माझा शब्द आहे, मी या लोकांना घरे मिळवून देणार,” असा ठाम निर्धार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.

दहिसर पूर्वेकडील रावळपारा परिसरातील शुक्ला कंपाऊंडमध्ये असलेल्या झोपड्या आणि व्यावसायिक गाळे महापालिकेकडून निष्कासित करण्यात आले मात्र या विरोधात गोपाळ शेट्टी यांनी आंदोलन पुकारल्यानंतर हा विषय हिवाळी अधिवेशनात देखील मांडण्यात आला. आमदार प्रकाश सुर्वे आमदार मनीषा चौधरी आमदार संजय उपाध्याय आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार सुनील प्रभू या आमदारांनी हा विषय अधिवेशनात उचलून धरल्यामुळे हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजले होते. अखेरीस आता थोडं कारवाई थांबल्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे याचं श्रेय रहिवाशांनी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना दिले आज रहिवाशांनी पेढे भरून गोपाळ शेट्टी यांच्या लढ्याचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या राजकारणाचे नवे संकेत, शिंदेंसोबत युती, 'लवचिक' झाली नाती

ZP निवडणुकीपूर्वीच भाजपचा नवा डाव ? नाराजांना झेडपीत मागच्या दारानं प्रवेश?

Saturday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकटाची चाहुल

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, एक वर्षांपासून होता फरार, कायद्याच्या बालेकिल्ल्यात अटकेचा थरार

सूर्यकुमार-शिवमची बॅट तळपली; भारताचा न्यूझीलंडवर दमदार विजय

SCROLL FOR NEXT