Mumbai Crime news  Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

Mumbai Crime news : मुंबईत बॉयफ्रेंडने तरुणीवर जीवघेणा हल्ला करत जीव घेतला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Vishal Gangurde

मुंबईच्या काळाचौकी परिसरात प्रियकराने केलेल्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झालाय

हल्ल्यानंतर आरोपी प्रियकराने आत्महत्या केलीये.

या घटनेनंतर परिसरात खळबळ आणि भीतीचे वातावरण पसरलंय

पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केलाय

मुंबईच्या काळाचौकी परिसरात बॉयफ्रेंडने केलेल्या जीवघेणा हल्ल्यात तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर आरोपी बॉयफ्रेंडने आयुष्य संपवलं. मुंबईतील हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील काळाचौकी परिसरात प्रेमसंबंधातून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर २४ वर्षीय तरुणाने गर्लफ्रेंडवर चाकून हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर बॉयफ्रेंडनेही चाकूने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तरुणाचा मृत्यू झाला.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील तरुणाचे मुलीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या काही महिन्यांपासून तो तिच्यावर परस्त्रीसंबंधांचा संशय घेत होता. या जोडप्यामध्ये या कारणावरून वारंवार वाद व्हायचे. आज सकाळी दोघांची पुन्हा भेट झाल्यानंतर वाद चिघळला. त्यानंतर संतापलेल्या तरुणाने चाकूने मुलीवर वार केला.

या हल्ल्यात तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यादरम्यान त्याने स्वतःलाही त्याच चाकूने वार करून आयुष्य संपवलं. काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

शिपाई किरण सूर्यवंशी यांनी दाखवलं धाडस

बॉयफ्रेंड तरुणीवर हल्ला करत असताना भायखळा वाहतूक विभागातील पोलीस शिपाई किरण सूर्यवंशी यांनी मोठं धाडस दाखवलं. पार्किंगच्या तक्रारीवर कारवाईदरम्यान आस्था नर्सिंग होममध्ये तरुणीवर चाकूने हल्ल्याची माहिती मिळताच किरण सूर्यवंशी घटनास्थळी धावले. त्यांनी पीडितेची आरोपीच्या तावडीतून सुटका करून तिला स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.जखमी तरुणीला पुढे सर जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gayatri Datar: मराठी अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; कॅब कॅन्सल केली, चालकाने फोन नंबर केला व्हायरल

Maharashtra News Live Update: भिवंडी नगरसेवक व पालिका अधिकारी यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर पालिकेकडून बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई

...तर लाडकी बहीण योजना बंद करा; हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं, VIDEO

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीचा भडका उडाला, आज प्रतितोळा इतक्या रूपयांवर आले; सुवर्णनगरीत आजचे दर काय?

Rare cancer symptoms: शेतकऱ्याला थकव्यामागे दडलेला दुर्मिळ कॅन्सर, आतड्यांमध्ये १४ सेमीचा ट्यूमर, डॉक्टरांनी वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT