Mumbai Rain  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडूप परिसरात पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढत जाताना विजेचा धक्का लागून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला होता.

Priya More

मयुर राणे, साम टीव्ही

महावितरणचा निष्काळजीपणा कसा जिवावर बेतू शकतो याची प्रचिती भांडुपमधील एका दुर्घटनेनं समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

हा व्हिडीओ नीट पाहा. भांडुपमध्ये हेडफोन लावून पाण्यातून चालत जाणाऱ्या एका तरूणाला आपल्या जीवाला मुकावं लागलयं आणि त्याला कारणीभूत ठरलाय महावितरणचा निष्काळजीपणा. भांडुपच्या एलबीएस मार्गावर जिथे ही घटना घडली तिथल्या एका दुकानदारानं महावितरणला पाण्यातून विजप्रवाह जात असल्याबदद्ल कळवलं होतं. मात्र महावितरणनं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

दरम्यान साम टिव्हीनं याप्रकरणाची दखल घेतल्यानंतर महावितरणाला जाग आली. वर असलेल्या उच्च दाबाच्या वायर जमिनीच्या खाली टाकण्याचे काम सुरु केलं. मात्र तोपर्यत एकाचा हकनाक जीव गेला. या घटनेमुळे भांडुपमध्ये खळबळ उडाली.

दीपकचा मृत्यू झाल्यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्याने आपल्याकडे तक्रार आली नसल्याचं सांगत आपली जबाबदारी झटकली..अशा अधिकाऱ्यांवर कधी कारवाई करणार? केवळ भांडुपच नव्हे तर मुंबईत अनेक ठिकाणी अशी अर्धवट काम लोकांच्या जीवावर उठली आहेत. मुंबईकरांना सुविधा पुरवणाऱ्या सगळ्याच व्यवस्थांचा एकूणच बोजवारा उडाला आहे आणि मुंबईकर भगवान भरोसे जगतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT