Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Bhandup Rain: मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुपमध्ये पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढत जात असताना एका १७ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO
Mumbai RainSaam Tv
Published On

Summary -

  • भांडूपमध्ये १७ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू.

  • स्थानिकांनी सकाळीच विजेचा करंट पाण्यात उतरल्याचे सांगितले होते.

  • महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाला.

  • हेडफोनमुळे तरुणाला नागरिकांचे आवाज ऐकू आला नाही.

मयुर राणे, मुंबई

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणांना झोडपून काढले. या पावसामुळे अनेक ठिकाणी भयंकर घटना घडल्या. कोणी पाण्यात वाहून गेले तर कुणाचा घर कोसळून मृत्यू झाला. वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेक जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. मुंबईतील भांडूपमध्ये एका १७ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. दीपक पिल्ले असं या मृत तरुणाचे नाव आहे. एलबीएस मार्गावरील पन्हालाल कंपाउंड परिसरात साचलेल्या पाण्यातून जाताना विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

धक्कादायक बाब म्हणजे पन्हालाल कंपाउंड परिसरातील रस्त्या शेजारी असणाऱ्या दुकानदारांनी महावितरणाला फोन करून सकाळी ८ वाजता पाण्यात विजेचा करंट आला असल्याचं सांगितलं होतं. परंतू महावितरणाने कुठलीही दखल घेतली नाही त्यानंतर अनेक जणांना या रस्त्यावरून चालत असताना विजेचा धक्का लागला. स्थानिकांच्या मदतीने सर्वांना या दिशेने जाऊ नका असे सांगण्यात येत होते. दीपक याठिकाणावरून जात होता. त्याने कानात हेडफोन लावले होते. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला आवाज देऊन रोखण्याचा प्रयत्न केला.

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO
Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

पण दीपकला हेडफोनमुळे आवाज ऐकू आला नाही आणि तो पुढे चालत राहिला. अशातच विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने दीपक जागेवरच कोसळला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. सकाळी साम टीव्हीने ही बातमी लावल्यानंतर महावितरणाला जाग आली आणि या ठिकाणी आता पूर्णपणे रस्त्याचे खोदकाम करून या हाय टेन्शन वायर जमिनी खाली टाकण्यात येत आहेत. या आधीच जर हे काम झाले असते तर ही घटना घडली नसती असे प्रत्यक्षदर्शिंकडून सांगण्यात येत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO
Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com