Mumbai Sea Link heavy truck entry ban violation saam tv
मुंबई/पुणे

मुंबई सी-लिंकवर अवजड ट्रकचा धुमाकूळ; नियम धाब्यावर, भरधाव वेगाने लेन बदलत प्रवास

Mumbai Sea Link Heavy Truck Entry Ban Violation: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवर अवजड वाहनांना बंदी असतानाही ट्रक धावताना दिसला. डॅशकॅमेराच्या व्हिडीओत ट्रक भरधाव वेगाने लेन बदलताना आणि ओव्हरटेक करताना दिसत आहे.

Omkar Sonawane

सुरज मसुरकर, साम टीव्ही

मुंबईच्या प्रतिष्ठेचा मानला जाणारा वांद्रे-वरळी सी-लिंक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सी-लिंकवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही एका अवजड ट्रकने भरधाव वेगाने पुलावरून प्रवास केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एका जागरूक नागरिकाने आपल्या कारच्या डॅशकॅमेरामध्ये हा प्रकार कैद केला आहे. व्हिडीओमध्ये MH 48 BQ 1127 क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रक दिसत आहे. ट्रकमध्ये साहित्य भरलेले असून ते हिरव्या ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. हा ट्रक सी-लिंकवरून वेगाने जाताना दिसत असून, यादरम्यान तो लेन बदलत तसेच इतर वाहनांना ओव्हरटेक करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

सी-लिंकवरील वाहतुकीच्या नियमांनुसार दुचाकी, ऑटो रिक्षा, अवजड मालवाहू ट्रक आणि ट्रॅक्टरला प्रवेशाची परवानगी नाही. या पुलावर प्रामुख्याने हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जातो. मात्र, नियमांची पर्वा न करता हा अवजड ट्रक सी-लिंकवर आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच ट्रक भरधाव वेगाने लेन बदलत आणि इतर वाहनांना ओव्हरटेक करताना दिसत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

व्हिडीओमध्ये ट्रक विरुद्ध दिशेच्या लेनमधून येताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकाराची संबंधित यंत्रणांकडून दखल घेतली जाणार का आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळाची बनावट यादी प्रसारित करणाऱ्या विरोधात कार्यवाही होणार- कृषी मंत्री दत्ता भरणे

Home Gardening : बाल्कनीपासून बेडरूमपर्यंत घरातील प्रत्येक कोपऱ्यात कोणती झाडे कुठे लावावीत? जाणून घ्या

IPS Officer: ३५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; युपी पोलीस दलात मोठा फेरबदल

काँग्रेसचा दारुण पराभव; अपक्ष उमेदवाराचा दणदणीत विजय, भाजप प्रणित संघटनेची काय स्थिती?

Sunday Horoscope: रविवार ठरणार लकी! गणेशोत्सवात 'या' राशींच्या आयुष्यात येणार पैसा आणि आनंद; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT