Sanjay Raut on Devendra Fadnavis Raj Thackeray Saam Tv News
मुंबई/पुणे

फडणवीस-राज भेट, राऊतांचा थेट सवाल, राऊतांचा नवा 'रोखठोक' दावा; फडणवीस-राज भेटीत काय घडलं?

Devendra Fadnavis Meets Raj Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागणार, अशी चर्चा रंगली. मात्र फडणवीस-राज भेटीत नेमकं काय घडलं? याचा रोखठोक दावा संजय राऊतांनी केलाय.

Prashant Patil

मुंबई : 19 वर्षानंतर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु झाली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागणार असल्याची चर्चा रंगली. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात खासदार संजय राऊतांनी ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोठा दावा केलाय..या भेटीमध्ये मराठी माणसाच्या भवितव्यावर एकतर्फी चर्चा झाल्याचा दावा राऊतांनी केलाय. त्यामुळे राऊतांनी मुखपत्रातून काय सांगितलयं.. पाहूयात...

फडणवीस-राज भेट, रोखठोक दावा

फडणवीस-राज भेटीच्या चर्चेची माझ्याकडे माहिती आहे

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस-राज भेट

दोघांमध्ये मराठी माणसांच्या भविष्याबद्दल एकतर्फी चर्चा झाली असावी

फडणवीस मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करु पाहणाऱ्या उद्योगपती गौतम अदानींचे समर्थक

फडणवीसांच्या काळात मुंबईतील जमिनी अदानींना दिल्या

मुंबईला भिकारी करुन सर्व माल गुजरातला नेण्याचा डाव आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी फडणवीसांना विचारला

दरम्यान, फडणवीस यांनी अदानींना मुंबईची जमीन दिल्यानं मराठी माणसाचे भवितव्य धोक्यात आहे, असंही राऊत म्हणालेत. तसेच मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अपराजीत आहे, अशी टीकाही राऊतांनी फडणवीसांवर केलीय.

राज - फडणवीस भेटीबाबत केलेल्या दाव्यातून राऊतांनी अजूनही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिलेत. याआधी राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांवर टीका करणारे संजय राऊत आता राज- फडणवीस भेटीनंतरही ठाकरे बंधूंची युती होणार असल्याचं म्हणताय़त.. त्यामुळे राज- उद्धव युतीच्या चर्चांमागे नेमकी कोणती राजकीय गणित शिजतायत? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT