Mumbai GBS SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai GBS: मुंबईत GBSने घेतला पहिला बळी, नायर रुग्णालयात उपचारादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

GBS Patient Died In Mumbai: मुंबईमध्ये जीबीएसने चिंता वाढवली आहे. मुंबईत जीबीएस आजाराने पहिला बळी घेतला आहे. नायर रुग्णालयात उपचारादरम्यान एका रुग्णांचा मृत्यू झाला.

Priya More

मुंबईमध्ये गिलेन-बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएसने सर्वांची चिंता वाढवली आहे. जीबीएसमुळे मुंबईमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. नायर रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एका ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जीबीएसमुळे राज्यातील मृतांचा आकडा ८ वर पोहचला आहे.

मुंबईतल्या वडाळा येथे राहणाऱ्या व्यक्तीला जीबीएसची लागण झाली होती. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही व्यक्ती बीएमसीच्या बी एन देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. नायर रुग्णालयाचे डीन डॉ. शैलेश मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी होता आणि त्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते.

पालघरमधील एका १६ वर्षीय मुलीला जीबीएसची लक्षणे आढळून आल्याने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १९७ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये पाच नवीन रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

पुण्यामध्ये आढळलेल्या रुग्णांपैकी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ४०, पीएमसीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील ९२, पिंपरी चिंचवडमधील २९, पुणे ग्रामीणमधील २८ आणि इतर जिल्ह्यांमधील ८ रुग्णांचा समावेश आहे. राज्यात जीबीएस आजाराने पहिला बळी सोलापूरमधील तरुणाचा घेतला. पुण्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड आणि आता मुंबईत जीबीएसच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ८ वर पोहचला आहे.

पुण्यामध्ये आढळलेल्या रुग्णांपैकी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ४०, पीएमसीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील ९२, पिंपरी चिंचवडमधील २९, पुणे ग्रामीणमधील २८ आणि इतर जिल्ह्यांमधील ८ रुग्णांचा समावेश आहे. एकूण जीबीएस रुग्णांपैकी १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ५० रुग्ण आयसीयूमध्ये आहेत आणि २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

राज्यात जीबीएस आजाराने पहिला बळी सोलापूरमधील तरुणाचा घेतला. पुण्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड आणि आता मुंबईत जीबीएसच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ८ वर पोहचला आहे. यामधील सात मृत हे पुणे विभागातील आहेत. जीबीएसमुळे आरोग्य विभाग सध्या अलर्ट मोडवर असून उपाययोजना करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT