मुंबईची तुंबई होणं हे आपल्यासाठी नवीन नाही; पण आता मुंबईकरांच्या डोक्यावर विनाशाची टागंती तलवारये. कारण पुढच्या काळात समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे कायमची बुडण्याची भीतीये. त्याला कारण आहे जागतिक पातळीवर वाढणारं कार्बन उत्सर्जन..या उत्सर्जनावर नियंत्रण आलं नाही तर आपल्या मुंबईची द्वारका होणार असल्याची भीती व्यक्त केली जातेय. त्याचेच संकेत गेल्या फक्त ५ दिवसात झालेल्या पावसानं दिले आहेत. या काळात जगात सर्वाधिक पाऊस मुंबईत झालाय.
मुंबई
जुलै 2026 920 मिमी
कोलकाता
जुलै 2026 367 मिमी
लागोस, नायजेरिया
जून 2026, 433 मिमी
सिओल, दक्षिण कोरिया
जुलै 2026 414 मिमी
ढाका, बांग्लादेश
जुलै 2026 391 मिमी
वेस्ट कोस्ट वेदरमन आणि 'रेन ट्रॅकर'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगातील इतर प्रमुख महानगरांमध्ये महिनाभरात जेवढा पाऊस पडतो, त्याच्या तिप्पट पाऊस मुंबईने अवघ्या ५ दिवसांत झालाय. त्यामुळे शास्त्रज्ञांनी मुंबईच्या भविष्याबाबत भीतीदायक इशारा दिलाय. आताच काळजी घेतली नाही तर २०५० आणि २१०० पर्यंत मुंबईचे अनेक सखल भाग पाण्यात जाणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. यात कोणत्या भागांना सर्वाधिक धोका आहे ते पाहूयात..
मुंबईतील हे भाग सर्वात आधी बडुणार?
नरीमन पॉइंट
कफ परेड
गिरगांव
बांद्रा
वर्सोवा
धारावी
हे भाग 3 - 4 फूट पाण्यात जातील आणि मुंबईतील 70 -80 टक्के भागात पाणी पातळी वाढून पुर येऊ शकतो. हेच भाग सखल आणि मुंबईच्या समुद्री किनाऱ्यापासून अगदी जवळचं आहेत. इथेच वेगवान वारे, चक्रीवादळ आणि समुद्राच्या लाटा घूसु शकतात. ही आकडेवारी धक्कादायक आणि भितीदायक नक्कीच आहे पण घाबरू नका. हाच धोका लक्षात घेऊन काही उपाय योजना करण्यात येतायेच.
मुंबईसाठी महत्त्वाच्या उपाययोजना?
मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन लागू
लाटांचा तडाखा रोखण्यासाठी आधुनिक सी-वॉलची उभारणी
मुंबई पालिकेनं क्लायमेट ॲक्शन प्लॅन लागू केलाय. त्यानुसार तटीय संरक्षण आणि समुद्री लाटांचा तडाखा रोखण्यासाठी आधुनिक सी-वॉल विकसित केल्या जातायेत. बीएमसीकडून शहरात मिशन कार्बन कंट्रोल राबवून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढवण्यावर भर दिला जातोय. मुंबईला वाचवण्यासाठी जरी हे उपाय असले तरी केवळ स्थानिक उपाय पुरेसे नाहीत, तर जागतिक पातळीवर ग्रीनहाऊस गॅस कमी करणे गरजेचं आहे. मुंबईत दरवर्षी हजारो कोटी कोटी रुपये महापालिका आणि सरकार ड्रेनेज आणि तटीय सुरक्षेच्या नावावर खर्च करत असते पण निसर्गाच्या या बदलत्या रूपापुढे हे सर्व दावे आता तोकडे पडू लागलेत. पावसाचे जुने रेकॉर्ड मोडून अवघ्या ५ दिवसांत ९२० मिमी पाऊस पाडणाऱ्या निसर्गाने मुंबईकरांना धोक्याचा सर्वात मोठा इशारा दिलाय. त्यामुळे हे धोके टाळण्यासाठी काय ठोस उपाय शोधले जातात आणि त्यांची अंमलबजावणी कशी करतं हे पाहणं महत्वाचं असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.