Ranwar Village Saam Tv
मुंबई/पुणे

Ranwar Village : मुंबईत पोर्तुगीजांनी वसवलेलं'रणवर'गाव, ३ दशकानंतरही जपतंय इतिहासाच्या खुणा; मॉडेल व्हिलेज बनणार का?

Ranwar Village Will Become Model Village : मुंबईत पोर्तुगीजांनी वसवलेलं 'रणवर'गाव मॉडेल व्हिलेज बनणार,अशा चर्चा सुरू आहेत. हे गाव ३ दशकानंतरही इतिहासाच्या खुणा जपत आहे. आपण या गावाबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई : वांद्रामधील तीन शतकं जुन असलेलं रणवर गाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण या गावाचा पुनर्बांधणी प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती मिळतेय. वांद्र्याच्या मूळ वस्त्यांपैकी एक असलेलं रणवर गाव आहे. आमदार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बुधवारी १० सप्टेंबर रोजी यासंदर्भात रणवरमधील रहिवाशांची भेट घेऊन यावर मार्ग काढलाय.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पामध्ये रणवर गावातील चिन्हे आणि पदपथ सुधारित केले जाणार आहेत. गावठाण संस्कृतीवर प्रकाश टाकणारे घटक सादर देखील सादर केले जाणार आहेत, अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलीय. मुंबई उपनगराचे पालकमंत्री एमपी लोढा यांना जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत या परिसराच्या सुशोभिकरणासाठी निधीची विनंती केल्याचं देखील शेलार यांनी सांगितलंय.

मॉडेल व्हिलेज बनू शकते

आशिष शेलार म्हणाले की, हे एक मॉडेल व्हिलेज बनू (Ranwar Village Will Become Model) शकते. कारण हे शहराच्या शेवटच्या उरलेल्या गावांपैकी एक आहे. त्याचे वारसा आकर्षण अजूनही अबाधित आहे. या प्रकल्पाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही या व्हिलेजमध्ये काही नवीन घटक जोडण्यासाठी उत्सुक आहोत. जसं की पायवाटांच्या जागी कोबलस्टोन मार्ग बसवले जावेत. याशिवाय या गावात वाहतुकीवर निर्बंध घालणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे हे गाव पायी चालणाऱ्यांसाठी नंदनवन बनेल, असं देखील आशिष शेलार म्हणाले आहेत.

वास्तुविशारद समीर डी'मॉन्टे गाव पुनर्संचयित करण्यासाठी काम करत (Ranwar Village) आहेत. ते देखील ९ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी गावाची वेगळी ओळख जपण्याचे श्रेय स्थानिकांना दिलंय. सर्व प्राधिकरणांसह पुरेसा समन्वय सुशोभीकरण गावाला पुन्हा नव्या ओळखीसह जिवंत करण्यात मदत करू शकते, असं ते म्हणाले आहेत.

रणवर गावाची खासियत काय?

रणवरमध्ये असलेली शतकानुशतके जुनी घरे ख्रिसमसच्या वेळी वांद्रा रेक्लेमेशनपेक्षा देखील जास्त पर्यटकांना आकर्षित करतात. हे घरं युरोपियन गावांची आठवण करून देतात. सणासुदी काळात सजावट करून सण साजरे केले (Mumbai News) जातात. रणवरे गाव शहर आणि खेडं या दोन्ही कल्पनांचा मध्य साधते. १७१६ च्या इतिहासात देखील या गावाचा उल्लेख आहे. वेरोनिका स्ट्रीट हे गावातील मुख्य आकर्षण आहे.

१७१६ मध्ये रणवर गाव घटत्या पूर्व भारतीय लोकसंख्येचे घर होते. बऱ्याच भागांमध्ये वेरोनिका स्ट्रीट रणवरमधील घरं विभाजित करते. त्यांपैकी काही पूर्वीच्या काळाप्रमाणे जुने (bandras heritage) वाटतात. अजूनही इथल्या वसाहतींमध्ये भूतकाळातील वास्तुशिल्प अवशेष आहेत. गॉथिक फ्रेम्सपासून ते क्वीन व्हिक्टोरियाच्या आकृत्या धातूच्या ग्रिलमध्ये कोरलेल्या आहेत.वांद्रे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला एक मैल अंतरावर हे गाव स्थित आहे. हिल रोडपासून वरोडा रोडवरून रणवर गावामध्ये जाता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT