raj thackeray raised the topic of chhaava film Saam Tv News
मुंबई/पुणे

चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं? चित्रपट बघून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाही; राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025 : छावा चित्रपटानंतर राज्यात निर्माण झालेल्या वादावरुन राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत.

Prashant Patil

मुंबई : मनसे नेते राज ठाकरे यांनी आज गुढी पाडवा मेळाव्यात विविध विषयांना हात घातला. छावा चित्रपटानंतर निर्माण झालेल्या वादावर त्यांनी भूमिका मांडली आहे. यावेळी परिस्थितीनुसार कशा पद्धतीने निर्णय घेतले जातात, त्याचे दाखले राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरे म्हणाले, हिंद प्रांतात एक अत्यंत कडवट आणि प्रभावी स्वप्न एका व्यक्तीला पडले त्या म्हणजे जिजाऊ साहेब. जिजाबाई त्यांचे स्वप्न, त्यांचे वडील असल्यापासून पाहत होत्या. त्यांना समजत नव्हते हे काय चालले आहे. आमची लोक या लोकांकडे चाकरी का करत आहेत.

छावा चित्रपटानंतर राज्यात निर्माण झालेल्या वादावरुन राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरमधून उतरला की हे सर्व उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान तुम्हाला आता कळले का? विकी कौशलमुळे संभाजी महाराज समजले का? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोके घालावे लागते.

औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत, आत्ता कुठून आठवला औरंगजेब? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणं देणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे, असं राज ठाकरे यांनी सुनावले.

दरम्यान, या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पर्यावरणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले. सरकारच्या नाकारर्तेपणामुळे आज देशातील नद्या मृत पावत आहेत. राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओच्या पॅटर्नद्वारे नद्यांची दयनीय स्थिती दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT