Wadala Church Road Accident: BEST Bus Crushes Mother and 7-Year-Old Child Saaam TV News Marathi
मुंबई/पुणे

Mumbai : शाळेतून परत येताना बेस्टने उडवले, माय-लेकाचा जागीच मृत्यू

Mumbai bus accident : वडाळा चर्चजवळ, वीर कोतवाल उद्यान ते भरणी नाका रस्त्यावर अपघात झाला. अपघातात ७ वर्षीय अँथनी सेल्वराज आणि त्याची आई लिओबह सेल्वराज यांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

  • मुंबईत वडाळा चर्चजवळ बेस्ट बसने आई आणि मुलाला जोरात धडक दिली.

  • ७ वर्षांचा अँथनी आणि त्याची आई लिओबह सेल्वराज यांचा मृत्यू झाला.

  • बस चालकावर गुन्हा दाखल करून माटुंगा पोलिसांनी अटक केली.

  • या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

BEST bus accident, Wadala : दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. त्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेतून घरी परतताना बेस्ट बसने मुलाला आणि आईला जोरात धडक दिली आहे, त्यामध्ये मायलेकाचा मृत्यू झाला आहे. ७ वर्षाच्या मुलाचे नाव अँथनी सेल्वराज तर आईचे नाव लिओबह सेल्वराजचा असे आहे. वडाळा चर्चजवळही दुर्दैवी घटना घडली. बेस्ट बसच्या खाली आल्याने चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान आईने प्राण सोडले. वीर कोतवाल उद्यान ते भरणी नाका बस क्रमांक ए- १७४ या बेस्ट बसचया धडकेत आईसह चिमुरड्याचा मृत्यू झाला. बस चालक बापुराव नागबोणेला याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून माटुंगा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Mumbai Wadala BEST bus accident news today)

सोमवारी दुपारी २ ते वाजताच्या आसपास वडाळा चर्चजवळ ही दुर्दैवी घटना घडली. सेंट जोसेफ स्कूलचे फादर सोलोमन रापोल यांनी अपघाताबाबत अँथनीच्या कुटुंबांना कळवले. त्यांनीच मुलाला आणि आईला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. अँथनीला डॉक्टरांना तपासून मृत घोषित केले. तर त्याच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बेस्ट चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईला सुरूवात केली आहे. या दु:खद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

जोसेफ स्कूलचे फादर सोलोमन रापोल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बस (क्रमांक: MH 03 C.V. 6648) चालक बाबुराव शिवाजी नागणबोने याने बेदरकारपणे आणि हयगयीने बस चालवून ईलोगोलीस लेओबा सेल्वराज (वय 40) आणि तिचा मुलगा अॅन्थॉनी लेओबा सेल्वराज (वय 07) यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. तक्रारीनुसार, अपघातानंतर चालक बाबुराव नागणबोने याने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. यामुळे फादर सोलोमन रापोल यांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. माटुंगा पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT