Slab collapses in DN Nagar Police Colony, Andheri; three children injured saamtv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

Andheri Police Quarters Slab Falls: मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरीतील डीएन नगर पोलिस कॉलनीमध्ये स्लॅब कोसळला. सततच्या मुसळधार पावसामुळे वाहतूक, लोकल ट्रेन आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

Bharat Jadhav
  • अंधेरीतील डी.एन. नगर पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळून तीन मुले जखमी झाली.

  • मुंबईतील मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि लोकल सेवा विस्कळीत झाली.

  • चेंबूरमध्ये एमएमआरडीची संरक्षण भिंत कोसळून सात झोपड्यांचे नुकसान झाले.

  • पोलीस वसाहतीत भीतीचं वातावरण असून काही कुटुंबं घरं सोडून गेली.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईतील अंधेरीतील डी.एन. नगर पोलीस अधिकारी वसाहतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडलीय. यात तीन मुले जखमी झाली आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये संततधार पाऊस होत असल्यानं शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा विस्कळीत झालीय. पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड होत असते.

चेंबूरमध्ये एमएमआरडीची संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत ७ झोपड्यांचे नुकसान झाले आहे. आता अंधेरीतील डी.एन. नगर पोलीस अधिकारी वसाहतीतील इमारत क्रमांक 8 मधील रूमचा स्लॅब कोसळला. यात घटनेत तीन लहान मुले जखमी झाली आहेत. घरांचे स्लॅब कोसळत असल्यानं या पोलीस अधिकारी वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तर ज्या घराचे स्लॅब कोसळलाय त्या घरातील पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडून भाड्याच्या घरात राहणं पसंत केलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, डी.एन. नगर पोलीस अधिकारी वसाहतीतील इमारत क्रमांक 8 मधील पहिल्या मजल्यावरील रूम नं.145चा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत तीन लहान मुले जखमी झाली आहेत. गंभीर बाब म्हणजे, यापूर्वी देखील या वसाहतीत स्लॅब कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या असून अधिकारी वर्गाने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केली होती. तरीसुद्धा संबंधित विभागाने दुरुस्ती व देखभाल कार्याकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा एकदा जीवितास धोका निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवासांत तीन चार पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. कामचा ताण, तणाव, नैराश्यामुळे पोलीस खात्यातील कर्मचारी टोकाचा निर्णय घेत आहेत. त्याचदरम्यान शासनाकडून त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी देण्यात येणाऱ्या घरांचे निकृष्ट पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

नागरिक व पोलीस कर्मचारी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात घडत आहेत. या अपघातांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: जालन्यातील बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात मुसळधार पाऊस

Maharashtra Government: सरकार शेतकऱ्यांना देणार गुड न्यूज: मुख्यमंत्री लवकरच पूर्ण करणार राज्यातील बळीराजाची मोठी मागणी

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल

थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

Crime : कानशिलात लगावल्याने बायको भडकली, रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

SCROLL FOR NEXT