मुंबईत पुढचे ३ तास महत्त्वाचे
मुंबईत जोरदार पावसाची शक्यता
अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे सेवादेखील उशिराने
काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्री पावसाचा जोर वाढला. मुंबईत ढगाळ वातावरण आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान, पुढच्या तीन तासात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे (Mumbai Rain Live Update Today)
पुढील ३ तासांत मुंबई,मुंबई उपनगर,रायगड,ठाणे येथे काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचसोबत वादळासह विजांच्या कडकडाटासह ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.यामुळे मुंबईत जोरदार सरी बसण्याची शक्यता आहे.
यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मॉन्सूनने यंदा तब्बल २ महिने १६ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला.नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
लोकल सेवा उशिराने (Mumbai Local Live Update Today)
मुंबईत कोसळधार पाऊस पडत आहे. यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे उशिराने आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे रेल्वे उशिराने धावत आहेत. परिणामी याचा फटका सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांना बसत आहे. मध्य रेल्वे १५-२० मिनिटे उशिराने धावत आहे तर हार्बर मार्गावरील ट्रेन ५-१० मिनिटे उशिराने धावत आहेत.
अंबेरी सबवे पाण्याखाली
मुंबईसह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. याचसोबत किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचले आहे. दरम्यान, सध्या तरी रस्ते वाहतूक सुरळीत आहे. मात्र, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे या पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.