Latest Videos Of Mumbai Rain: Unseasonal Rain In Mumbai Thane Due Climate Change Saam TV
मुंबई/पुणे

Heavy Rain in Mumbai: सगळीकडं काळोख...धुराळा अन् तुफान पाऊस, मुंबईतल्या पावसाचं रौद्ररूप पाहा VIDEO मधून

Priya More

मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. भरदुपारी अंधार, जोरदार वादळी वाऱ्यासह मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. कामावरून घराच्या दिशेने जाणाऱ्या मुंबईकरांची तारंबळ उडाली. मुंबईतील रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवर, हवाई वाहतुकीवर आणि मेट्रो वाहतुकीवर परिणाम होण्यास सुरूवात झाली आहे.

हवामान खात्याने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईकरांनो घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. मुंबईत पुढील ३ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकारांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

मुंबई विमानतळावरची हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावर उतरणारे अनेक विमाने दुसरीकडे वळवण्यात आले आहेत. मुंबईतल्या दादर, लोअर परेल, माटुंगा, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

हवामान खात्याकडून मुंबईत 15 मे पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान खात्याचा अंदाज कुठेतरी खरा ठरतोय. मुंबईतील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडत आहे. या पावासामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या ठाकिणी अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुसळधार पावासाचा फटका ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल सेवा आणि मेट्रो सेवेवेर झाला आहे. मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर मुंबई मेट्रो -१ ची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. असल्फा मेट्रो स्टेशनजवळ पाणी साचले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT