Mumbai Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain: मुंबईसह, पुण्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस; लोकल सेवा धीम्या गतीने, प्रवाशांची मोठी तारांबळ VIDEO

Rohini Gudaghe

मुंबई : पावसासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. आज सकाळपासूनच शहरात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरामध्ये आज १३ जूलै रोजी शनिवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा खोळंबा (Mumbai Rain) झालाय. सध्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, दादर, भिवंडीसह परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचं समोर आलंय. पावसाचा परिणामी लोकल ट्रेनवर झालाय. लोकल धीम्यागतीने सुरू आहेत.

दादर परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

पावसामुळे लोकलदेखील काही मिनिटांनी उशिरा धावत (Rain Latest Update) आहेत. दादर परिसरात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. मुंबई उपनगरात काल देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. जोरदार पावसामुळे किंग सर्कल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. काल पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किंग सर्कल भागात पाणीच पाणी झाल्याचं समोर आलं होतं. दादरकडून चेंबूरकडे जाणारी वाहतूक देखील मंदावली होती. ठाण्यात देखीस सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसतंय.

पुणे शहरात मुसळधार पाऊस

पुण्यात आज सकाळपासून काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू (Pune Rain) आहे. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण जून महिन्यापासून अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. धरण क्षेत्रात देखील अजून जोरदार पाऊस झालेला नाही. पण आता पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

काल हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस शहरात ठिकठिकाणी कोसळला. पुण्यात १४ जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी (Monsoon Update) कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला. पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वाल बनला नंबर 2! नंबर 1 बनण्यासाठी अवघ्या इतक्या धावांची गरज

Baramati News : बारामती हादरले.. दोन अल्पवयीन मुलींवर चौघांकडून अत्याचार; तिघे पोलिसांच्या ताब्यात

Chikungunya New Varient: पालकांनो काळजी घ्या! मुलांना अधिक धोका, चिकुनगुनियाचा नवा व्हेरिएंट; लक्षणं काय? काळजी काय घ्याल?

Maharashtra News Live Updates: कॉग्रेस नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

Patchup With Partner After Breakup : ब्रेकअपनंतरही जोडीदारासोबत होऊ शकत पॅचअप, फक्त करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT