Mumbai : रेल्वे पोलिसाने वाचवला, ट्रेन खाली जाणाऱ्या महिलेचा जीव, पहा Video  सुमित सावंत
मुंबई/पुणे

Mumbai : रेल्वे पोलिसाने वाचवला, ट्रेन खाली जाणाऱ्या महिलेचा जीव, पहा Video

ती ट्रेनखाली जाणार, एवढ्यातच तिथे कर्तव्य बजावत असणाऱ्या मंगेश यांनी क्षणाचाही विलंब न करता, या महिलेला बाहेर खेचले आणि पुढील अनर्थ टळला!

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावर आज बुधवार दुपारी फलाट क्रमांक ४ वर कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबल मंगेश थेरे, यांनी एका महिलेचा जीव वाचवला आहे. आज दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी फलाटावर आलेल्या कामयानी एक्सप्रेसमधून, चालत्या ट्रेन मधून उतरण्याचा प्रयत्न करताना एक महिला तोल जाऊन ट्रेन खाली पडली. ती ट्रेनखाली जाणार, एवढ्यातच तिथे कर्तव्य बजावत असणाऱ्या मंगेश यांनी क्षणाचाही विलंब न करता, या महिलेला बाहेर खेचले आणि पुढील अनर्थ टळला!

अरुणा रेखा असे या महिलेचे नाव असून त्या ६२ वर्षांच्या आहेत. अरुण या ठाण्यात राहतात. त्या कोणार्क एक्स्प्रेस ने प्रवास करायचा होता, परंतु चुकीची ट्रेन पकडल्याने घाईगडबडीत आपण उतरण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेत दैव बलवत्तर अन मंगेश यांच्या हजरजबाबीपणामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून त्या सुस्थितीत आहेत.

दरम्यान, रेल्वेकडून नियमित प्रवाश्यांना आवाहन करण्यात येतं कि, चालत्या ट्रेन मधून कोणीही चढू अगर उतरु नये, परंतु प्रवाश्यांकडून या सूचनांच पालन होताना दिसत नाही, आणि त्यामुळेच अश्या घटना अनेकदा घडत असतात.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा विमान अपघात नव्हे , 100 टक्के घातपात; रोहित पवारांचा आरोप

T20 World Cup Ind vs Pak: क्रिकेटमध्ये देशप्रेम की पैसाप्रेम? ICC ने दम दिल्यानंतर पाकिस्तानचा यू-टर्न

राज्यात १२ वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचा सुळसुळाट, कुठे कुठे घडले गैरप्रकार?

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांना घातपात होण्याची शंका आधीच आली होती?

दुर्घटनांची मालिका सुरूच; टेकऑफनंतर १५ मिनिटांत विमान समुद्रात कोसळलं

SCROLL FOR NEXT