Mumbai Government Hospital women Doctor Death Body Found  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Mumbai News : मुंबई सेंट्रलमधील जगजीवन राम रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. अनुजा कुलकर्णी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हॉस्पिटल क्वार्टरमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई सेंट्रलमधील जगजीवन राम रुग्णालयात महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला

  • डॉ. अनुजा कुलकर्णी या कान-नाक-घसा तज्ज्ञ होत्या

  • हॉस्पिटल क्वार्टरमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

  • पोलिसांकडून तपास सुरू

Mumbai Government Hospital women Doctor Death Body Found मुंबईत एका महिला डॉक्टरचा रुग्णालय परिसरात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला डॉक्टर मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयात कार्यरत होती. रुग्णालयाच्या खोलीमध्ये फरशीवर त्यांचा मृतदेह पडलेला आढळला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अनुजा कुलकर्णी असे मृत झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्या कान-नाक-घसा तज्ज्ञ होत्या. पश्चिम रेल्वे विभागाच्या जगजीवन राम रुग्णालयात त्या कार्यरत होत्या. त्या रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील क्वार्टरमध्ये राहत होत्या.बुधवारी ऑपरेशनसाठी डॉ. कुलकर्णी यांच्या अपॉइंटमेंट होत्या. मात्र त्या ठरलेल्या वेळेत ऑपरेशन थिएटरमध्ये आल्याच नाही.

त्यामुळे त्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न करण्यात आले. कुलकर्णी यांच्याकडून कॉलला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णालयातील त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी चौथ्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या खोलीकडे धाव घेतली. रूमचा दरवाजा उघडताच अनुजा कुलकर्णी यांचा फरशीवर संशयास्पद अवस्थेत मृतदेह पडलेला होता.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवला. कुलकर्णी यांच्यासोबत मृत्यूपूर्वी काय घडलं? त्यांचा मृत्यू कसा झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यासाठी सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली जात आहे. दरम्यान हॉस्पिटलच्या आवारात महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा 24k, 22k, 18k सोन्याचे दर

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहराला आज संध्याकाळी पाणीपुरवठा राहणार बंद

धावत्या लोकलमध्ये तुफान राडा, ग्रुपने दरवाजा अडवला; महिला थेट ट्रॅकवर कोसळली, VIDEO

Watermelon Ice Cream Recipe : कलिंगडापासून बनवा थंडगार आईस्क्रीम, कडाक्याच्या उन्हात मिळेल थंडावा

High Blood Pressure : फक्त हृदय नाही, तर शरीराच्या 'या' भागांवरही होतो हाय BP चा परिणाम

SCROLL FOR NEXT