Hyperloop Test Track  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Hyperloop : विमानापेक्षाही वेगानं मुंबईहून पुण्याला पोहचा, 600 km/hr वेगानं धावणार अन् फक्त २५ मिनिटांत पोहचणार

Hyperloop Mumbai-Pune News Update : मुंबई आणि पुणे आता हाकेच्या अंतरावर येणार आहे. होय... हायपरलूप ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई आणि पुणे हे अंतर फक्त २५ मिनिटांत पार होणार आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai-Pune Hyperloop News Update : मुंबई ते पुणे हा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वे, रस्ते मार्गे दररोज मुंबई-पुणे-मुंबई असा प्रवास अनेकजण करतात. मुंबई-पुणे प्रवासासाठी कमीत कमी ३ ते चार तासांचा कालावधी लागतोच. पण हा वेळ फक्त २५ मिनिटांवर आला तर.. होय हे सत्यात उतरणार आहे. मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप सेवा सुरू होणार आहे. केंद्राकडून याबाबत वेगाने काम सुरू आहे. हायपरलूप सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ तर वाचणार आहेच, पण आरामदायी अनुभवही मिळणार आहे.

भारतातील पहिली हायपरलूप सेवा महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरादरम्यान सुरू होणार आहे, त्यामुळे ही शहरे हाकेच्या अंतरावर येणार आहेत. दोन शहरांमधील अंतर फक्त २५ मिनिटे इतकेच होणार आहे. भारतामध्ये 600 km/hr वेगाने हायपरलूप धावू शकते, असे अहवालातून समोर आले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाचे क्रांतिकारक पाऊल ठरलं जातेय. हायपरपूल रेल्वेमुळे महाराष्ट्रातील सर्वात दोन मोठी शहरे जोडली जाणार आहे, त्यामुळे व्यवसाय वाढण्यास चालना मिळेलच. विशेष म्हणजे मुंबई-पुणे हायपरलूप पूर्ण झाल्यावर जगातील सर्वात लांब हायपरलूप ट्रॅक असेल.

हायपरलूप प्रकल्प काय आहे?

हायपरलूप ही विमानापेक्षाही जास्त वेगाने धावणारी रेल्वे आहे. हायपरलूप रेल्वेसाठी व्हॅक्यूम ट्यूबमध्ये मॅग्नेटिक तंत्रज्ञानाचा पॉड्सचा वापर केलेला असतो. हायपरपूल रेल्वे १२०० किमीच्या वेगाने धावू शकते, ही जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या रेलवेपैकी एक आहे. पण भारतात हायपरपूल रेल्वे ६०० किमी वेगाने धावणार असल्याचे अहवालातून समोर आले आहे. हायपरपूलमुळे प्रदूषण होत नाहीच, पण खूप कमी प्रमाणात वीज लागते.

हायपरलूप रेल्वे कुठे तयार होतेय ?

आयआयटी मद्रास येथे हायरलूप रेल्वेवर काम केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मद्रास आयआयटीमधील हायपरलूपचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. भारतात हायपरलूप रेल्वेसाठी वापरण्यात येणारे पॉड्स हे जगातील सर्वात मोठे असतील, असे सांगण्यात येत आहे. भारतामधील हायपरपूल प्रोजेक्ट जगातील सर्वात मोठा असेल, असेही समोर आले आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे या दोन शहरांशिवाय बेंगळुरू आणि चेन्नई दरम्यान हायपरलूप ट्रेन चालवण्याचाही केंद्र सरकारचा प्लॅन आहे. भविष्यात आणखी काही शहरेही हायपरलूप ट्रेनद्वारे जोडली जाणार आहे. हायपरलूप तंत्रज्ञानाच्या विकासात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे, त्यामुळे मुंबई-पुणे कॉरिडॉर हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे जो देशातील वाहतुकीचे भविष्य बदलू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT