Mumbai Pune Accident x
मुंबई/पुणे

Mumbai Pune Accident : मुंबई-पुणे मार्गावर मृत्यूचा सापळा! वर्षभरात ९७ अपघात, सर्वाधिक अपघात कुठे?

Mumbai Pune Accident News : मागील एका वर्षामध्ये मुंबई-पुणे प्रवासादरम्यान ९७ अपघात झाले आहेत. सहा ठिकाणी सर्वाधिक अपघात होत आहेत. वर्षभरात १४ जणांचा या प्रवासात अपघाती मृत्यू झाला आहे.

Yash Shirke

  • मुंबई-पुणे प्रवास ठरतोय जीवघेणा

  • मागील १२ महिन्यात तब्बल ९७ अपघात

  • १४ जणांचा अपघाती मृत्यू, शेकडोजण जखमी

Mumbai Pune : मुंबई-पुणे प्रवास अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. मागील वर्षभरात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग यावर सहा ठिकाणी सर्वात जास्त अपघात झाल्याची नोंद आहे. खोपोलीसाठी बाहेर जाण्याचा मार्ग ते आडोशी उतारापासून ढेकू हे अंतर जीवघेणे ठरत आहे. या ठिकाणी मागील बारा महिन्यात लहान-मोठे असे ९७ अपघात झाले आहेत. यात १४ जणांचा मृत्यू झाला असून शेकडोजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई-पुणे प्रवासादरम्यान सर्वाधिक अपघात कुठे?

मुंबई-पुणे प्रवासादरम्यान भातण बोगदा, आडोशी उतार, अंडा पॉइंट, माडप बोगदा, खोपोलीची बाह्यमार्गिका हे सर्वाधिक अपघाताचे क्षेत्र बनले आहे. तीव्र उतार, रस्त्यांची वळणे याशिवाय जलदगतीने आणि बेदरकारपणे वाहने चालवणे यामुळे या ठिकाणांवर ७० ते ७५ टक्के अपघात होत असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी आडोशी बोगद्यात अनियंत्रित ट्रक कंटेनरमुळे झालेल्या अपघातात २५ पेक्षा जास्त वाहनांचे नुकसान झाले होते. याशिवाय दोघांचा मृत्यू झाला होता. २४ मे रोजी ट्रेलरची कारला धडक झाल्याने एका कुटुंबातील तिघेजण मृत्युमुखी पडले होते. वाहतूक नियमांचे पालन न करता वेगाने वाहन चालवल्याने सर्वाधिक अपघात झाले आहेत.

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

मुंबई-पुणे प्रवासादरम्यान अपघातांची संख्या कमी करण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्र उपाययोजना, वेग मर्यादा तसेच दर्शक सूचक फलक लावणे, दुभाजकांची दुरुस्ती अशा उपाययोजना राबवाव्यात. याशिवाय अपघात झाल्यानंतर जखमींना तात्काळ उपचार मिळावेत अशी सुविधा उपलब्ध करणे, उपाययोजना राबवताना अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

‘मिसिंग लेन’चा उपाय

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लेनचा पाहणी दौरा केला होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल असे त्यांनी जाहीर केले. या मिसिंग लेनमुळे खंडाळा घाटामधील चारचाकी वाहनांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल. पर्यायी मार्ग उपलब्ध होत असल्याने वेळ, इंधन यांची बचत होईल. शिवाय अपघातांवर नियंत्रण मिळवता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT