
एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्र असल्यास होणार शिक्षा
एका वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी होऊ शकतो तुरुंगवास
मतदान करण्याचा अधिकारही काढला जाऊ शकतो
EPIC Rules Voter ID : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असे म्हटले जात आहे. महाराष्ट्रातप्रमाणे देशातील इतर भागांमध्येही निवडणुकीचे वारे वाहत आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहारमध्ये निवडणुका असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेथे मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) अंतर्गत जारी केलेल्या मसुदा मतदार यादीमध्ये अनियमिततेच्या तक्रारी सतत येत आहेत. या काळात एकाच मतदाराच्या दोन मतदार ओळखपत्रांची प्रकरणे समोर आली आहे.
दोन आधार किंवा दोन पॅक क्रमांक ठेवण्याप्रमाणेच दोन मतदार ओळखपत्रे ठेवणे बेकायदेशीर आहे. दोन मतदार ओळखपत्रे ठेवल्यास दंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. मतदानाच्या अधिकारापासून मतदाराला वंचित ठेवले जाऊ शकते. दोन मतदार ओळखपत्रे ठेवण्याबाबत निवडणूक आयोगाने राजद नेते तेजस्वी यादव यांना नोटीस पाठवली आहे.
निवडणूक आयोगाकडून एसआयआरचे सतत निरीक्षण केले जात आहे. प्रत्येक तक्रारीची किंवा चुकीच्या माहितीची सत्यता पडताळली जात आहे. राज्यात एसआयआर अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये मतमोजणी फॉर्म वाटप आणि प्राप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात दावे आणि हरकतींची प्रक्रिया सुरु झाली आहे.
जर कोणत्याही मतदाराकडे दोन ठिकाणी मतदार ओळखपत्र असतील, तर त्यापैकी एक ओळखपत्र तात्काळ रद्द करावे. याकरीता संबंधित क्षेत्रातील बूथ लेव्हल ऑफिसरकडे जाऊन फॉर्म-७ भरुन टाकावा. मृत्यू किंवा ठिकाण बदलल्यामुळे नाव काढून टाकण्यासाटी फॉर्म-७ अंतर्गत अर्ज करता येतो. याशिवाय आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊनही ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र रद्द करता येते. आयोगाच्या अधिकृत सूत्रांनुसार, दोन मतदार ओळखपत्रे असण्याबाबत निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम १७ आणि १८ अंतर्गत जास्तीत जास्त एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. संबंधित व्यक्तीचा मतदानाचा अधिकार देखील रद्द केला जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.