MUMBAI TO PUNE IN 48 MINUTES! INDIAN RAILWAYS PLANS SEVEN HIGH-SPEED RAIL CORRIDORS Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune : High-Speed रेल्वेचा ३८० प्रति किमीचा स्पीड, मुंबई ते पुणे प्रवास पूर्ण होणार फक्त ४८ मिनिटात

Mumbai Pune High Speed Rail Update : भारतीय रेल्वे देशभरात सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे अवघ्या ४८ मिनिटांत, तर दिल्ली ते सिलिगुरी केवळ ६ तासांत गाठणे शक्य होणार आहे.

Alisha Khedekar

  • भारतीय रेल्वे देशभरात सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित होणार

  • मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी अवघ्या ४८ मिनिटांवर

  • उत्तर भारतातील प्रवास वेगवान होणार

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता मुंबई पुण्यात फक्त ४८ मिनिटात पोहचता येणार आहे. कारण भारतीय रेल्वेने देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प राबवण्याच्या तयारीत आहे. रेल्वे मंत्रालयाने देशभरात सात प्रमुख हाय-स्पीड रेल कॉरिडोर विकसित करण्याची योजना आखली असून यासाठी कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे . या प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पांमुळे देशातील प्रमुख शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुरी या प्रस्तावित हाय-स्पीड रेल्वे मार्गांची पाहणी केली. या प्रकल्पामुळे दिल्ली ते सिलिगुरी हा प्रवास अवघ्या सहा तासांत पूर्ण होणार आहे. सध्या या प्रवासासाठी लागणारा वेळ यापेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. प्रस्तावित पहिला हाय-स्पीड रेल्वे मार्ग दिल्ली ते वाराणसी असा असून तो ९४५ किलोमीटर लांबीचा असेल. या मार्गावर प्रवास केवळ साडेतीन तासांत पूर्ण होईल.

दुसरा वाराणसी ते सिलिगुरी हा ६७० किलोमीटरचा मार्ग असून प्रवासाचा कालावधी फक्त २.४ तासांवर येईल. तसेच मुंबई ते पुणे या १७० किलोमीटर अंतराचा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. याशिवाय पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरू, बंगळुरू-चेन्नई आणि चेन्नई-हैदराबाद या मार्गांवरही हाय-स्पीड रेल्वे धावणार आहे. त्यामुळे दक्षिण, उत्तर आणि पूर्व भारतातील प्रमुख शहरांमध्ये वेगवान कनेक्टिव्हिटी निर्माण होईल. दरम्यान, भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन विकसित करण्याचे कामही सुरू आहे.

सुरुवातीला ही ट्रेन ताशी २८० किलोमीटर वेगाने धावणार असून भविष्यात तिचा वेग ३५० किलोमीटर प्रतितास करण्याची योजना आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू असून २०२९ पर्यंत हा महत्त्वाकांक्षी मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे भारतातील रेल्वे प्रवास अधिक जलद, आधुनिक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

ITR filing: 31 जुलैपूर्वी ITR फाईल केल्यास काय फायदे मिळतात?

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, ठाकरेंचे खासदार शिंदे गटात जाणार का? गैरहजर खासदाराने मोजक्या शब्दात सांगितलं

Chanakya Niti: बँक खात्यात पैसा टिकवायचा असेल तर या 5 ठिकाणी बना महाकंजूस, आचार्य चाणक्यांनी दिला खास सल्ला

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पाऊस लांबल्याने हळद पिकाला तुषार सिंचनाचा आधार

SCROLL FOR NEXT