Ind vs SL test : केएल राहुलनं बॅटमधून वाऱ्याच्या वेगानं निघालेला चेंडू फिल्डरच्या थेट डोक्याला लागला; मैदानातच उडाली धावपळ

KL Rahul- Nishan Madhushka ind vs SL test : भारत विरुद्ध श्रीलंका कसोटीत मैदानात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. केएल राहुलनं टोलवलेला चेंडू थेट श्रीलंकेच्या फिल्डरच्या डोक्यावर लागला. हेल्मेटमुळं अनर्थ टळला.
क्रिकेटच्या मैदानात थरार, फलंदाजानं टोलवलेला चेंडू थेट फिल्डरच्या डोक्यावर आदळला, अन्...
KL Rahul shot hits Nishan Madhushka helmet video.saam tv
Published On

भारत विरुद्ध श्रीलंका गॉल कसोटीत हृदयाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला. मैदानातील खेळाडूच काय, तर स्टेडियममधील प्रेक्षकही काही वेळ स्तब्ध झाले. डावाच्या दहाव्या षटकात भारताचा संयमी फलंदाज केएल राहुलनं वायूवेगानं टोलवलेला चेंडू श्रीलंकेचा फिल्डर निशान मधुश्का याच्या डोक्यावर लागला. हा फटका इतका जोरात होता की, मधुश्काला मैदान सोडावं लागलं.

गॉल कसोटीत टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. तत्पूर्वी टॉस जिंकून भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली. दहावं षटक सुरू होतं. त्यावेळी मैदानात घडलं त्याचा कुणी कधी विचारही केला नव्हता. सगळेच या घटनेने हादरले. केएल राहुलनं जोरानं मारलेला चेंडू श्रीलंकेचा क्षेत्ररक्षक निशान मधुश्का याच्या लागला. त्यामुळं मधुश्काला मैदान सोडावं लागलं.

हेल्मेटनं जीव वाचला!

भारताचे सलामीवीर जबरदस्त फॉर्मात दिसून आले. दहावं षटक सुरू होतं. पाचव्या चेंडूवर ही घटना घडली. प्रभात जयसूर्याचा चेंडू केएल राहुलनं टोलवला. शॉट लेगला उभ्या असलेल्या निशानच्या डोक्यावर तो चेंडू आदळला. त्यानं हेल्मेट घातलं होतं. त्यामुळं तो मोठ्या दुखापतीपासून बचावला.

निशान मधुश्का मैदानाबाहेर

फिजिओनं मैदानात धाव घेतली. त्यानं निशानला तपासलं. त्यानंतर मैदानाबाहेर घेऊन गेला. फटका मारल्यानंतर केएल राहुल धाव घेण्यासाठी पळू लागला. पण निशानला किती लागलंय, नेमकं काय झालंय, याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. धाव पूर्ण झाल्यानंतर राहुल निशानकडे गेला. श्रीलंकेचा फिजिओही त्याच्याकडे गेला. निशानला तपासल्यानंतर त्याला मैदानाबाहेर घेऊन गेला.

गॉल कसोटीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली. त्यावेळी केएल राहुल हा अवघ्या १२ धावांवर खेळत होता. भारताच्या एकूण ३८ धावा झाल्या होत्या. यापूर्वी डोक्याला चेंडू लागून क्रिकेटपटू गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात खेळाडूनं हेल्मेट घालणं किती महत्वाचं आहे, हे या घटनेने अधोरेखित झालं आहे.

क्रिकेटच्या मैदानात थरार, फलंदाजानं टोलवलेला चेंडू थेट फिल्डरच्या डोक्यावर आदळला, अन्...
Harmanpreet Singh: टीम इंडियाचं मिशन वर्ल्डकप! 51 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय हॉकी संघ सज्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com