Mumbai-Pune Expressway Update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

Mumbai-Pune Expressway Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

दिलीप कांबळे

Pune News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली आहे. कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे

पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर मातीचा ढिगारा कोसळला आहे. कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरच ही घटना घडली आहे. पावणे नऊ वाजता घडलेल्या घटनेनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू आहे. काही वेळात मातीचा हा ढिगारा बाजूला घेतल्यावर उर्वरित दोन लेनही सुरू केल्या जातील. (Mumbai-Pune Expressway Latest Update)

रविवारी रात्री साडे दहा वाजता दरडीची पहिली घटना घडली ती मुंबई मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ तर दुसरी दरड त्याच मध्यरात्री तीन वाजता लोणावळ्याजवळ कोसळली होती. चार दिवसानंतर ही तिसरी घटना घडलेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, वाहतूक ही सुरळीत आहे.

वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहतूककोंडी, वाहनांच्या लांबलचक रांगा

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी ते मालाड दरम्यान सध्या वाहतूककोंडी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : मळके कपडे, धड उभंही राहता येईना; प्रसिद्ध अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय? व्हायरल VIDEO नं चाहते चिंतेत

America: अमेरिकेत अचानक 'ग्राउंड स्टॉप', ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही; नेमकं कारण काय?

Kitchen Hacks : मिरची कापताच हातांची होतेय आग? साबण नाही, तर 'या' सोप्या उपायाने मिनिटांत जळजळ होईल कमी

Maharashtra News Live Update: BMC ची वनक्षेत्र आणि संरक्षित झोपडपट्टी परिसरात टॉवर उभारण्यास परवानगी

Pune : "तुम्हाला घरपोच दारू मिळेल" होम डिलिव्हरीचे आमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा

SCROLL FOR NEXT