Kalyan Rain News: कल्याणमध्ये संपूर्ण वस्तीत शिरलं पाणी, १५० कुटुंबांचे स्थलांतर

Kalyan Latest News: कल्याणमध्ये संपूर्ण वस्तीत शिरलं पाणी, १५० कुटुंबांचे स्थलांतर
Kalyan Rain News
Kalyan Rain NewsSaam Tv
Published On: 

Kalyan Rain News: आज सकाळपासून कल्याण डोंबिवलीला पावसाने झोपडपून काढले. कल्याण पूर्व परिसरातील वालधूनी नदी लगत असलेल्या शिवाजीनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले. वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदी किनारी असलेल्या नागरीकांच्या घरात गुडघाभर पाणी साचल्याची घटना घडली.

महापालिकेच्या आपतकालीन विभागाने या परिसरातील १५० कुटुंबांचे अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे. वालधूनी नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून नागरीक करीत आहेत. मात्र त्याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.

Kalyan Rain News
Schools Closed Tomorrow in Thane : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

'आम्हाला फक्त भिंत बनवणून हवी'

वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने शिवाजीनगरची वस्ती पाण्याखाली गेली आहे. हे येथील दरवर्षीच चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिक नागरिक येथे सुरक्षा भिंत बनवण्यात यावी, अशी मागणी करत आहेत. जेणेकरून नदीच्या पाण्याची पातळी वाढली तरी पाणी वस्तीत येणार नाही. (Latest Marathi News)

याचबाबत बोलताना एका स्थानिक महिलेने म्हटलं आहे की, ''आम्हाला सरकारकडून काही नको. फक्त येथे लवकरात लवकर सुरक्षा भिंत बांधण्यात यावी.'' तर एका स्थानिक नागरिकाचे म्हणणं आहे की, ''नेहमीच येथे पाणी भरतं. यामुळे लहान मुलांचे अक्षरश: हाल होतात. यामुळे येथे भिंत बांधावी. मागच्या वर्षी याच परिस्थतीतीमुळे दोन ते तीन जण दगावले होते.''

Kalyan Rain News
Mumbai Local Train Update: रेल्वे वाहतुकीला पावसाचा तडाखा, लोकल उशिराने; ठाणे स्टेशनवर तोबा गर्दी

दरम्यान, पावसाने जोर धरल्याने कल्याण बदलापूर रोडवरती प्रचंड पाणी साठले असून, अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर रोड वरती वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हा रोड एका बाजूने बंद करण्यात आला असून एकाच मार्गाने वाहतूक सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.