Mumbai news Saam tv
मुंबई/पुणे

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी ब्लॉक, पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या

mumbai pune expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी ब्लॉक घोषित करण्यात आलाय. जाणून मार्गावरील पर्यायी मार्ग

Saam Tv

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीत बदल

मार्गावर शुक्रवारी दोन तास वाहतूक राहणार बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पर्यायी मार्ग जाणून घ्या

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या आडोशी बोगद्याजवळ बसवण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकलेले दगड काढण्याचे शुक्रवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी 12 ते २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरुन बोरघाटमार्गे प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जड व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.

बोरघाट मार्गे मुंबई वाहिनीवरील कि.मी. क्र. 59.000 पासून सर्व जड-अवजड वाहनासांठी वाहतूक वरील कालावधीमध्ये बंद राहील. तसेच बोरघाटमार्गे पुणे वाहिनीवरील कि.मी. क्र. 30/000 पासून जड-अवजड वाहनासांठी वाहतूक या कालावधीमध्ये बंद करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे.

पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी मोटार वाहने, बसेस / प्रवासी वाहने ही वाहतूक कि.मी. क्र. 59/000 पासून कनेक्टिंग लिंकमार्गे मुंबईकडे सुरु राहील. तर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी हलकी मोटार वाहने व बसेस / प्रवासी वाहने ही कि.मी. क्र 39/00 येथून कनेक्टिंग लिंकमार्गे पुणेकडे सुरु राहणार आहे. लोणावळा-खंडाळा मुंबईकडे जाणारी हलकी मोटार वाहने, बसेस / प्रवासी वाहने तसेच जड-अवजड वाहने द्रुतगतीवरील कि.मी. क्र. 45/00 येथे थांबविण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करावे. तसेच या कालावधीदरम्यान अडचण आल्यावर मदतीसाठी द्रुतगती मार्गाच्या नियत्रंण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 आणि महामार्ग पोलीस विभागाचा दूरध्वनी क्रमांक 9833498334 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT