Mumbai Pune Expressway Shivneri Bus Accident Saam TV
मुंबई/पुणे

Shivneri Bus Accident News: मुंबई पुणे-एक्सप्रेस वेवर शिवनेरी बसचा भीषण अपघात; चालकासह ६ प्रवासी जखमी

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. खोपोलीजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास शिवनेरी बसचा अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम, साम टीव्ही

Mumbai Pune Expressway Shivneri Bus Accident: मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावरील खोपोलीजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास शिवनेरी बसचा अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकाला धडकून उलटली. या घटनेत बसचालकासह ६ प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी खोपोली पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील ३ प्रवाशांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची शिवनेरी बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास बस खोपोलीजवळ आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण (Bus Accident) सुटले आणि बस थेट रस्त्यावरील दुभाजकाला धडकून उलटली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील (Shivneri Bus) ६ प्रवासी जखमी झाले असून बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

SCROLL FOR NEXT