Mumbai Pune Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्‍झिटपासून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग काय?

Mumbai-Pune Expressway Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवने प्रवास करणारे प्रवासी आणि वाहन चालकांसाठी अत्‍यंत महत्‍वाची बातमी आहे. पुण्‍याहून मुंबईकडे येताना खोपोली एक्झिटपासून पुढे मुंबईकडे जाणारा नेहमीचा मार्ग दुरूस्‍तीच्‍या कामासाठी वाहतुकीस बंद करण्‍यात आला आहे.

Vishal Gangurde

सचिन कदम, रायगड

Mumbai-Pune Expressway Update :

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवने प्रवास करणारे प्रवासी आणि वाहन चालकांसाठी अत्‍यंत महत्‍वाची बातमी आहे. पुण्‍याहून मुंबईकडे येताना खोपोली एक्झिटपासून पुढे मुंबईकडे जाणारा नेहमीचा मार्ग दुरूस्‍तीच्‍या कामासाठी वाहतुकीस बंद करण्‍यात आला आहे. यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करणार आहे. (Latest Marathi News)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्झिटपासून पुढे मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आल्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. यामुळे मुंबईला जाण्‍यासाठी पर्यायी मार्ग म्‍हणून खोपोली एक्झिटजवळ नवीन तीनपदरी मार्ग तयार करण्‍यात आला आहे. तो आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्‍यात आला आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या मार्गाचा वापर करता येईल. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनी खोपोली एक्झिट पूर्वी साइन बोर्ड बघून डाव्‍या बाजूने प्रवास करावा, असे महामार्ग पोलीसांकडून आवाहन करण्यात आलं आहे.

कल्याण –शिळ रस्त्यास वै.ह.भ.प.श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

कल्याण ते शिळ या रस्त्यास वै.ह.भ.प. श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव देण्यात आले आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात मागणी केली होती.

भिवंडी-कल्याण-शिळफाटा या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करून तो सहापदरी करण्याचे काम करण्यात येत आहे. रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु आहे. या रस्त्यांपैकी कल्याण ते शिळ या रस्त्यास वै.ह.भ.प. श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव देण्यात येईल. या प्रकल्पासाठी यापूर्वीच सुधारित बांधकाम खर्चापोटी ५६१.८५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सध्या या रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang War: आंदेकर टोळीतल्या समीर काळेचा भाऊ गणेश काळेला का संपवलं? जुनं कनेक्शन आलं समोर

MNS Leader Attacked : मनसेच्या शहरप्रमुखाला बेदम मारहाण, निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वादातून हल्ला झाल्याचा संशय

Maharashtra Live News Update : वाशिम मध्ये मुसळधार पाऊस... कापसासह तुरीला फटका.......

Maharashtra Local Body Elections: निवडणुका नेमक्या कधी होणार? महायुतीच्या नेत्याने थेट तारखाच सांगितल्या

Bigg Boss 19 : प्रणित मोरे बिग बॉसच्या घराबाहेर का गेला? नेमका कोणता आजार झाला होता, माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT