Suresh Wadkar on Narendra Modi : साईबाबांनीच नरेंद्र मोदींना प्रधानमंत्रिपदी बसवलं : सुरेश वाडकर

Suresh Wadkar Latest News in Marathi : अनेक वर्षांनंतर सुरेश वाडकर हे साई दर्शनाला पोहोचले. यावेळी साई संस्थानच्या वतीने वाडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साई बाबांनीच नरेंद्र मोदींना प्रधानमंत्रिपदी बसवलं, असं वक्तव्य गायक सुरेश वाडकर यांनी केलं.
Suresh Wadkar
Suresh WadkarSaam tv
Published On

सचिन बनसोडे, शिर्डी

Suresh Wadkar Latest News :

गायक सुरेश वाडकर यांनी साई दरबारी भेट दिली. वाडकर यांनी सहकुटुंब साई समाधीचे दर्शन घेतलं. अनेक वर्षांनंतर सुरेश वाडकर हे साई दर्शनाला पोहोचले. यावेळी साई संस्थानच्या वतीने वाडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साई बाबांनीच नरेंद्र मोदींना प्रधानमंत्रिपदी बसवलं, असं वक्तव्य गायक सुरेश वाडकर यांनी केलं. (Latest Marathi News)

सुरेश वाडकरांनी सांगितली शिर्डीची जुनी आठवण

गायक सुरेश वाडकर यांनी शिर्डीत येऊन साईबाबा मंदिराला भेट दिली. यावेली वाडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. सुरेश वाडकर म्हणाले, 'शिर्डीत खूप वर्षांनी येणं झालं. आईची शिर्डीला येण्याची प्रखर इच्छा होती. मला साई दर्शनानंतर फक्त रडायला येतं. मी साईबाबांकडे काहीच मागत नाही.1967 पासून मी साईबाबांच्या दरबारी येतो. बाबा काहीही न मागता सगळं देतात'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Suresh Wadkar
Maratha Aarkshan : मराठा आंदोलकांनी महामंडळाची बस पेटवली; हिंगोली- नांदेड मार्गावरील घटना

'पूर्वीची आणि आताची शिर्डी यात जमीन अस्मानचा फरक आहे. पूर्वी लक्ष्मीवाडीपासून सायकलवर यायचो. तासंतास समाधीसमोर बसायचो. आता खूप बदल झाला आहे, असे ते म्हणाले.

Suresh Wadkar
Maratha Aarkshan : मराठा आंदोलकांनी महामंडळाची बस पेटवली; हिंगोली- नांदेड मार्गावरील घटना

नरेंद्र मोदी सर्वकाही व्यवस्थित करतील : सुरेश वाडकर

आरक्षणासहित सर्व राजकीय घडामोडीवर भाष्य करताना सुरेश वाडकर म्हणाले, 'मी गाणं गाणारा माणूस आहे. मला राजकारणाबद्दल काहीही माहीत नाही. खरंतर साईबाबांनीच नरेंद्र मोदींना प्रधानमंत्रिपदी बसवलं आहे. नरेंद्र मोदी सर्वकाही व्यवस्थित करणार आहेत. सर्व देवीदेवतांनी चांगलं करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नेमणूक केली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com