Mumbai Pune Missing Link Bridge Accident: saam tv
मुंबई/पुणे

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकवर भीषण अपघात; तीन कार एकमेकांवर आदळल्या

Mumbai Pune Missing Link Bridge Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक केबल ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. अपघात नेमका कसा घडला जाणून घ्या.

Bharat Jadhav

सचिन कदम, साम प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्सप्रेसे वेवरील मिसिंग लिंकच्या ब्रिजवर तीन वाहनांचा भीषण अपघात झालाय. अचनाक ब्रेक लावल्यानं तीन कार एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. या अपघातात तिन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु सुदैवाने यात कोणालाच दुखापत झाली नाहीये. मिसिंग लिंकच्या पुणेकडील लेनवरील केबल ब्रिजवर हा अपघात झाला. मुंबईहून पुण्याकडे एक फॉर्च्युनर कार जात होती. ही कार तिसऱ्या लेनमधून जात होती, त्यावेळी कार चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यावेळी मागून येणाऱ्या दोन कार या फॉच्युनरवर आदळल्या.(Mumbai-Pune Expressway Accident)

मिसिंग लिंकच्या पुलावार बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त तिन्ही गाड्या मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. यातील फॉर्च्युनर गाडी अचानकपणे मिसिंग लिंकवरील केबल स्ट्रे पूलाजवळ तिसऱ्या मार्गिकेवर थांबली. त्यामुळे मागून येणारी हुंदाई कंपनीची कार वेगाने येऊन फॉर्च्युनर गाडीवर आदळली. यानंतर वेरना गाडीने आणखी एका कारला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की, तीन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र प्रवाश्यांनी सीट बेल्ट लावले असल्याने आणि गाडीतील एअर बॅग्ज उघडल्याने, जीवितहानी टळली. दरम्यान या दुर्घटनेनंतर या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र यंत्रणांच्या तत्पर कार्यवाहीमुळे वाहतूक लवकरच सुरळीत झाली. महामार्गावर वाहन चालविताना सुरक्षित अंतर राखणे, अचानक ब्रेक न मारणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin care: दररोज सनस्क्रीन लावूनही चेहऱ्यावर टॅनिंग होत आहे? त्वचारोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे 5 कारण

दारू पार्टीत नको ते घडलं; मित्रांनी प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा, तरुण थेट ICU मध्ये

खासदारांची फोडाफाडी का होतेय? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पडद्यामागील राजकारण

Operation Tiger: पुन्हा काय झाडी, काय डोंगर... ठाकरेंच्या त्या खासदारांना दिल्लीतून तडकाफडकी हलवलं, आता कुठं?

Thursday Horoscope : मनाप्रमाणे दिवस जाईल, ५ राशींच्या व्यक्तींवर गणेशाची कृपा राहणार; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT