Mumbai Pune Expressway Bus Accident  Saam TV
मुंबई/पुणे

Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरची बसला धडक; कंडक्टरचा जागीच मृत्यू

Satish Daud

Mumbai Pune Expressway Bus Accident

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी उतरण्यासाठी थांबलेल्या ST बसला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी (२९ सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. शिवराज माळी असं मृत कंडक्टरचं नाव आहे.  (Latest Marathi News)

सुदैवाने या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ठाणे डेपोची होती. ती उगमरग्याहून ठाण्याला येत होती.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील एका थांब्याजवळ प्रवाशांना उतरण्यासाठी बस थांबली असता, पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक (Bus Accident) दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बस कंडक्टर शिवराज माळी यांचा जागीच मृत्यू झाला. शिवराज हे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी होती.

धावत्या पिकअपला अचानक आग

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुणे लेनवर धावत्या महिंद्रा पिकअप टेंपोला अचानक भीषण आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. या आगीत पिकअपमधील सामान जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या आगीत गाडीमधील सामान जळून खाक झाले. बोनेटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT