Mumbai Pune Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway: गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार; कधीपासून येणार सेवेत?

Mumbai Pune Expressway 10 Lane Extension: मुंबई पुणे एक्सप्रेस वेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार आहे.

Siddhi Hande

मुंबई-पुणे एक्सप्रेसबाबत महत्त्वाची अपडेट

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ वाचणार

मुंबई-पुणे प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा आता विस्तार होणार आहे. हा प्रवास सुखकर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे या मार्गाचे १० पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाहतूक कोंडी फुटणार आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेचे १० पदरीकरण होणार (Mumbai Pune 10 Lane Extension)

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या एक्सप्रेस वेच्या विस्ताराचे काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहे. याबाबत MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

काम कधीपर्यंत पूर्ण होणार? (Mumbai Pune 10 Lane Extension Work Update)

मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या १० पदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. हे काम पुढच्या ३ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. २०२९-३० पर्यंत हो काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. दरम्यान, हा एक्सप्रेस वे १० पदरी झाला तर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. वाहतूक कोंडी होणार नाही. याचसोबत काम सुरु असताना सध्याच्या वाहतुकीला अडथळा येऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे.

टोलबाबात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता (Mumbai Pune Expressway Toll)

मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या विस्तारासाठी खूप निधी लागणार आहे. हा निधी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन उभारला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी टोल वसुलीच्या मुदतीत १५ वर्षांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे टोल मुदत २०४५ वरुन २०२६० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UIDAI Internship: आधार बनवणाऱ्या कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी, UIDAI मध्ये इंटर्नशिप; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

Jalna: जालन्यात ज्वालामुखी? जमिनीतून निघतोय ज्वलनशील पदार्थ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT