Mumbai-Pune Express Way Block Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Way Block: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आज तीन तासांचा ब्लॉक, कोणत्या मार्गाने वळवण्यात येणार वाहतूक?

Mumbai-Pune Express Way Block: खालापूर तालुका हद्दीत खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय मार्गावर काम सुरू असल्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ३ तासांचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णणे बंद राहणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai-Pune Express Way Block

खालापूर तालुका हद्दीत खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय मार्गावर काम सुरू असल्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ३ तासांचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णणे बंद राहणार आहे.

खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय मार्गावर 50 टन वजनाचे गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ३ या वेळेत पुणे लेनवरील वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 1 किलोमीटर अंतरासाठी मुंबई लेन वरून वळवण्यात येणार आहे. दुपारी 3 नंतर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

पेण खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली फाटा येथील पुलाच काम सुरू आहे. त्यामुळे एक्सप्रेस वे ची पुणे लेन दुपारी 12 ते 3 या वेळेत बंद राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. प्रसिद्धी पत्रक काढून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 1 किलोमीटर अंतरासाठी मुंबई लेन वरून वळवण्यात येणार आहे.

पेण खोपोली राष्ट्रीय महामार्ग पाली फाटा येथून मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून जातो. दरम्यान पेण खोपोली रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरून आहे. तसेच एक्सप्रेस वे वरील या पुलासाठी सुमारे 50 टन वजनाचे पुलाचे गर्डर बसविण्याचे काम आज केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT