Mumbai’s Powai R A Studio where 20 children were held hostage by a YouTuber linked to Pune. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Powai Hostage: पवईत २० मुलांना ओलिस ठेवणारा आरोपी कोण? आरोपीचं पुणे कनेक्शन

Mumbai Powai Hostage Who Is Rohit Arya: मुंबईतील पवई परिसरातील एक धक्कादायक घटना घडलीय. एका युट्यूबरने एका अॅक्टिंग स्टुडिओमध्ये २० मुलांना ओलिस ठेवले. पोलिसांच्या तपासात आरोपीचे पुण्यातील कनेक्शन उघड झाले आहे.

Bharat Jadhav

  • पवईतील आर ए स्टुडिओमध्ये २० मुलांना ओलीस ठेवल्याची घटना

  • आरोपी रोहित आर्य यूट्यूबर आहे.

  • पोलिस तपासात आरोपीचा पुणे कनेक्शन समोर आलं आहे.

मुंबईमधील पवईमध्ये एका इमारतीमध्ये २० मुलांना डांबून ठेवल्याची खळबळजनक घटना घडल्याचे समोर आली आहे. दिवसाढवळ्या मुलांना ओलीस ठेवण्यात आलंय. ही घटना आर ए स्टूडियोमध्ये घडलीय. या स्टूडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे क्लास घेतले जातात. मिळालेल्या माहितीनुसार ऑडिशनसाठी मुलांना बोलवलं होतं. दरम्यान २० मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी कोण? याबाबत खुलासा झालाय.

समोर आलेल्या माहितीनुसार येथे १०० मुलं ऑडिशनसाठी आले होते. यातील १५ ते २० मुलांना एका व्यक्तीनं एका खोलीत डांबवून ठेवलं होतं. मुलांना ओलीस ठेवणारा हा व्यक्ती याच स्टूडिओमध्ये काम करत होता. तो यूट्यूब चॅनल चालवत होता. त्याचे नाव रोहित आर्य असल्याचे सांगितले जात आहे.

मुलांना बंधक बनवल्याची बाब उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलांना डांबवून ठेवलेल्या स्टुडिओला चहु बाजुंनी घेरलं आणि मुलांना कसं सोडवलं जावं याची रणनिती बनवली. बंधक बनवणारा व्यक्ती हा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलीय.

रोहित आर्य हा एक सरकारी कंत्राटदार होता. शिक्षण खात्याचे २ कोटी रुपयांची बिल थकवले. रोहित आर्यानं दीपक केसरकर यांच्यावर आरोप केलेत. या बिलासाठी रोहित आर्यनं केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री असताना उपोषण केलं होतं.

पीएलसी स्वच्छ मॉनिटर प्रकल्पाचे बिल थकल्यानं त्याने उपोषण केलं होतं. याबाबत दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. माझी शाळी सुंदर शाळा या सरकारच्या उपक्रमात रोहित आर्य सहभागी होता. त्याला आपण स्वत: पैसे दिले होते अशी प्रतिक्रिया दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

Maharashtra Politics : ठाकरेंच्या जागेवर शिंदे-मनसे लढत; उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मशाल पेटणार, इंजिन धावणार!

Beed Politics : 'मुंडे प्रचाराला आल्यास विपरित घडेल'; बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस?

SCROLL FOR NEXT