कल्याण पूर्वेत चाललंय काय? अल्पवयीन तळीरामांची दहशत, लोकांना रस्त्यावर शिवीगाळ अन्..

Drunken Teen Gang Abuses Citizens on Main Road: कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलांनी रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घातला. तसेच नागरिकांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ देत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
Drunken Teen Gang Abuses Citizens on Main Road
Drunken Teen Gang Abuses Citizens on Main RoadSaam
Published On
Summary
  • कल्याण पूर्वेत अल्पवयीन तळीरामांचा धिंगाणा

  • व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांमध्ये संताप

  • तरूणांनी शिवीगाळ करून दहशत माजवली

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पूर्वेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अल्पवयीन मुलांच्या धिंगाण्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अल्पवयीन तरूणांनी गाडीवर बसून दारूची बाटली हातात घेऊन व्हिडिओ शूट केला. तसेच नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. दरम्याान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे अल्पवयीन मुलं मोटरसायकलवरून कल्याण पूर्वेतील मुख्य रस्त्यांवरून फिरत होती. त्यांच्या हातात दारूच्या बाटल्या होत्या आणि ते रस्त्याने जाणाऱ्या लोकांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होते. काहींनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला.

Drunken Teen Gang Abuses Citizens on Main Road
डिलिव्हरी बॉयकडून चारचाकीला धडक, जोडप्याला राग अनावर; तरूणाला चिरडलं, घटना CCTVत कैद

व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. गर्दुल्ले गँग आणि चरसी टोळी नंतर आता या अल्पवयीन तळीरामांनी परिसरातील शांतता भंग केली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Drunken Teen Gang Abuses Citizens on Main Road
डॉक्टर महिलेसोबत अफेअरचा संशय, भावाकडून KEM रुग्णालयातील डॉक्टरवर चाकूने वार

स्थानिक रहिवाशांनी संबंधित मोटरसायकल मालक तसेच या अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांकडून व्हिडिओच्या आधारे मुलांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर कल्याण पूर्वेत खळबळ उडाली आहे. दरम्यान, अल्पवयीन तळीरामांवर पोलीस नेमकी काय कारवाई करतील? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com