Mumbai Pollution Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Pollution : प्रदूषणाचे स्रोत देण्यास एमपीसीबीचा नकार; आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

Mumbai Pollution News : प्रदूषणाची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम. असं असलं तरी 'वॉचडॉग फाउंडेशन'ला मुंबईतील प्रदूषणाच्या स्त्रोतांची माहिती देण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने चक्क नकार दिला आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Sandeep Gawade

प्रदूषणाची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम. असं असलं तरी 'वॉचडॉग फाउंडेशन'ला मुंबईतील प्रदूषणाच्या स्त्रोतांची माहिती देण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने चक्क नकार दिला आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

'वॉचडॉग फाउंडेशन'चे प्रमुख गोडफ्रे पिमेंटा यांनी याबाबत दिलेल्या माहिती नुसार , त्यांनी आरटीआय च्या माध्यमातून मुंबईतील प्रदूषणाच्या स्त्रोतांची माहिती विचारली होती. यासह एमपीसीबीने मुंबईतील वायू प्रदूषण स्थळांबाबत केलेल्या तपासणीचा अहवाल देखील त्यांनी मागितला होता.तसेच मुंबई विभागातील वाहनांचे उत्सर्जन कमी करण्यासाठी तयार केलेल्या अहवालाची प्रत ही त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून मागितली होती.

आरटीआय ला उत्तर देतांना अशी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे एमपीसीबी ने लेखी कळवले आहे की, अर्जदाराने विचारलेली माहिती प्रचंड, विपुल आहे.याशिवाय ही माहिती वायू प्रदूषणाच्या विविध पैलू/विषयांशी संबंधित आहे. त्यामुळे ही माहिती उपलब्ध करण्यास शक्य नाही. अर्जदाराने विशिष्ट माहिती मागितल्यास ती माहिती उपलब्ध करून दिली जाईल असे ही त्यांनी कळवले आहे.

मुंबईत प्रदूषणाचा स्तर वाढल्यानंतर त्याची कारणे शोधण्याचे निर्देश एमपीसीबी प्रशासनाला ला दिले होते.इतकेच नाही तर प्रदशनास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कडक कारवाईचे निर्देध देखील देण्यात आले होते. एमपीसीबी च्या अध्यक्षपदावर सिद्धेश कदम आल्यानंतर त्यांनी देखील याबाबत बैठक घेऊन प्रदूषणाची नियमावलीचे पालन न करणाऱ्या घटकांवर कारवाईचे निर्देश दिले होते.

प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी एमपीसीबी ची आहे. मात्र त्यांच्याकडूनच माहिती देण्यास चालढकल केली जात आहे. यामुळे एमपीसीबी प्रदूषणाच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसतं, असं आरटीआय कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Shocking: पोलिस चौकीसमोर मर्डर; बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या भावाची धारदार शस्त्राने केली हत्या, परिसरात खळबळ

Pune Car Accident : कोरेगाव पार्कात भयानक अपघात, कार वेगात मेट्रोच्या खांबाला धडकली, दोघांचा मृत्यू,थरारक CCTV व्हिडिओ

सोनं आजच खरेदी करा; २,६२० रूपयांनी स्वस्त, चांदीच्या दरातही कमालीची घट, जाणून घ्या लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT