Congress Political News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Politics : मुंबई काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार, आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

Mumbai congress Political News : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक जगदीश अण्णा कुट्टी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News :

मुंबई काँग्रेसला सुरु झालेली गळती थांबायचं नाव घेत नाही. आधी मिलिंद देवरा आणि त्यानंतर बाबा सिद्धिकी या बड्या काँग्रेस नेत्यांना पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर मुंबईत कमकुवत झालेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. (Latest Marathi News)

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक जगदीश अण्णा कु्ट्टी भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपमध्ये प्रवेश करताना जगदीश कु्ट्टी यांनी म्हटलं की, काँग्रेस पक्षात अनेक वर्ष काम केलं. त्यामुळे पक्ष सोडताना त्रास झाला. मात्र अनेक लोक अजून येणार आहेत. आज जास्त नाही बोलणार पुढे बोलेन. कुट्टी यांनी बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा उल्लेख केला.

मुंबईत काँग्रेसला खिंडार

काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसातच माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला होता.

बाबा सिद्धीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधील बडे नेते पक्षातून बाहेर पडताना दिसत आहे.

मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी यांच्यानंतर झिशान सिद्धीकी सुद्धा काँग्रेस सदस्यपदाचा राजीमाना देऊ शकतात, अशी शक्यत वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हे मोठे धक्के मानले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT