mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये; भाडे नाकारणाऱ्या रिक्षा,टॅक्सी चालकांचा परवाना होणार रद्द

Mumbai News: वारंवार भाडे नाकारणाऱ्या ऑटो रिक्षा/टॅक्सी चालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड

Mumbai News: वारंवार भाडे नाकारणाऱ्या ऑटो रिक्षा/टॅक्सी चालकांची आता खैर नाही. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. ऐन पावसाळ्यात भाडे नाकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

वारंवार भाडे नाकारणाऱ्या ऑटो रिक्षा /टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. आता मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडून वारंवार भाडे नाकारणाऱ्या ऑटो रिक्षा/टॅक्सी चालकांचे परवाना जप्त करून निलंबित करण्यासाठीचे प्रस्ताव संबंधित परिवहन कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.

मुंबई वाहतूक विभाग त्यांच्या विभागातील रिक्षा/टॅक्सी चालक यांच्या संघटनांशी संपर्क साधून बैठकीचे आयोजन करणार आहे. रिक्षा/टॅक्सी चालकांना प्रवाशांशी सौजन्याने वागावे, तसेच भाडे नाकारू नये अशा सूचना देण्यात येणार आहे.

भाडे नाकारू नये, अशा आशयाचे फलक रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरातील दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. भाडे वाढण्यासाठी दूरच्या मार्गाचा वापर केल्यासही कारवाई होणार आहे.

गर्दीच्या ठिकाणी तसेच पर्यटन स्थळी रिक्षा / टॅक्सी चालकांकडून सर्रास भाडे नाकारले जातात. यामुळे अशा ठिकाणी अधिकारी व अंमलदार नेमून नियमित कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आले आहे. काही गर्दीच्या ठिकाणांचा शोध घेऊन डमी ग्राहक पाठवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित रिक्षा/टॅक्सी चालक यांच्यावर तात्काळ मोटार वाहन कायदा कलम १७८ (३) अन्वये कारवाई होणार आहे. आता भाडे नाकारणाऱ्या रिक्षा/टॅक्सी चालकांवर कारवाई होणार का, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: CSMT पुनर्विकासासाठी १२८ झाडांवर कुऱ्हाड

Night Leg Pain : फक्त रात्रीच पाय का दुखतात? दुर्लक्ष करू नका, 'ही' असू शकतात ३ गंभीर कारणं

Mumbai : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मोबाईल टॉवर उभारणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या

Good News: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुष्काळात फडणवीस सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय

Young Cricketer Death: टीम इंडियाच्या खेळाडूने संपवलं आयुष्य; क्रिकेट विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT