Shivsena Crisis: मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदार पात्र की अपात्र? ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Shivsena Supreme Cour Hearing: ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून मुख्यमंत्री शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Cour Hearing:
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Cour Hearing:saam tv
Published On

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Cour Hearing: राज्यात एकीकडे युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद सुटता सुटत नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र? हा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Cour Hearing:
Maharashtra Politics: शासन आपल्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसं कळेल? CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

यासंदर्भातील याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. आज या याचिकेवर महत्वपूर्ण सुनावणी होणार असून सुप्रीम कोर्ट (Supreme Court) नेमकं काय निर्णय देतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. सर्वोच्च न्यायालयाने साधारण अडीच महिन्यांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यासंदर्भात जाणून बुजून उशीर करत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Cour Hearing:
Raj Thackeray Bhashan: राज ठाकरेंचा एकला चलो रे चा नारा; खेडमधील सभेत बोलताना केली मोठी घोषणा

ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते सुनील प्रभू यांनी यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताच विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटातील (शिंदे आणि ठाकरे) आमदारांना नोटीस पाठवली आहे.

या आमदारांना अपात्र का केले जाऊ नये असे विचारत ७ दिवसांच्या आत उत्तर मागविले आहे. लेखी उत्तर आले नाही तर विधानसभा अध्यक्ष आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळाला शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झाली आहे. त्यावर तसेच आमदारांनी दिलेल्या पुराव्यांआधारे नार्वेकर निकाल देणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com