Mumbai Police Drink and Drive Cases  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मद्यपी वाहनचालकांना पोलिसांचा दणका; मुंबईसह, ठाण्यात शेकडो गुन्हे, अनेकांची पळापळ

Satish Daud

Mumbai Police Drink and Drive Cases

वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या तळीरामांना पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. मुंबईत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २७५ वाहनचालकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

तर ठाण्यात २९७ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नवीन वर्ष २०२४चं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांसह, ठाण्यातील नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२३ला रात्री मोठा जल्लोष केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सेलिब्रेशन करण्यासाठी समुद्र किनारे, पर्यटन स्थळे, रेस्टोरंट्स, पब आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. काहींनी तर संपूर्ण रात्रच घराबाहेर काढली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जवळपास १०० ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे मार्ग देखील बदलण्यात आले होते. काही ठिकाणे 'नो पार्किंग झोन' तयार करण्यात आले. रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यात येणार, असा इशारा याआधीच पोलिसांनी दिला होता.

३१ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनचालकांची तपासणी केली. यावेळी मुंबईत तब्बल २७५ वाहनचालक मद्यपान करुन गाडी चालवताना आढळले. पोलिसांनी या वाहनचालकांना ताब्यात घेऊत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

दुसरीकडे ठाणे पोलिसांनी देखील मद्यपी वाहनचालकांना मोठा दणका दिला. ठाण्यात तब्बल २९७ जणांविरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कलमाअंतर्गत केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. मद्यपान केल्यानंतर वाहन चालवू नका, असं आवाहन वारंवार पोलिसांकडून केलं जातं.

मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन अनेक जण अपघातांना निमंत्रण देतात. हे रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली होती. त्याशिवाय 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'मध्ये सापडणाऱ्या वाहनचालकांविरोधातील कायदेही कठोर करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : मोदींचा महाराष्ट्र दौरा; वर्ध्यातून संबोधित करणार

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

SCROLL FOR NEXT