Mumbai Police salary scam Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Police : महाराष्ट्रात खळबळ, मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा वेतन घोटाळा, बोगस पोलिसांच्या नावे कोटींवर मारला डल्ला

Mumbai Police salary scam : मुंबई पोलीस दलातील ₹६.५ कोटींचा वेतन घोटाळा उघडकीस आला आहे. बोगस पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावावर पगार काढल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ganesh Kavade

नेहमी इतरांचे घोटाळे आणि गुन्हे उघडकीस आणणाऱ्या मुंबई पोलिस दलातच आता एक कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. पोलिसांचे वेतन (पगार) काढणाऱ्या मंत्रालयीन लिपिक आणि अधिकाऱ्यांनीच शासनाच्या तब्बल साडेसहा कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात ५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका घोटाळा कसा झाला?

पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा डेटा जुन्या 'सेवार्थ' प्रणालीतून नव्या प्रणालीत (System) ट्रान्सफर करताना या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयात पोलिसांचे पगार काढण्याचे काम चालते. येथील मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी जे लोक पोलिस दलातच नाहीत, अशा ८ ते १० बोगस व्यक्तींना 'पोलिस कर्मचारी' म्हणून दाखवले. केवळ इतकेच नाही, तर त्यांच्या नावावर बँक खाती उघडून शासनाकडून त्यांचे नियमित पगारही काढले.

ऑडिटमध्ये उघडकीस आली चोरी:

या सर्व प्रकाराबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचे ऑडिट (लेखापरीक्षण) केले. या ऑडिटमध्ये पगाराच्या रकमेत मोठी तफावत आढळली. ज्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये पगारापोटी जमा झाले, त्यांची नावे तपासली असता ते कोणीही पोलिस दलात कार्यरत नसल्याचे सिद्ध झाले.

कोण आहेत ते बोगस पोलिस?

तक्रारीनुसार, रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या नावांवरून हे पगार काढले जात होते. हे लोक नेमके कोण आहेत आणि त्यांचे या अधिकाऱ्यांशी काय संबंध आहेत, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल:

उत्तर प्रादेशिक विभागातील पोलिस निरीक्षकांच्या तक्रारीवरून समतानगर पोलिस ठाण्यात फसवणूक, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, प्रमुख लिपिक अजय राठोड, आणि वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम या ५ जणांना आरोपी बनवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजुरा न्यायालयासमोर गोळीबार; एक ठार, आरोपींची पोलिसांसमोर शरणागती

मराठी रिक्षाचालकाला परप्रांतियाची मारहाण, मराठी विरोधात माजोरड्या भैय्यांचा मुंबईत संप

कुछ तो बडा होने वाला है ! राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी CM फडणवीस मैदानात

Peanut Mirchi Bhaji Recipe: नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा कुरकुरीत टेस्टी शेंगदाणा-मिरची भजी, वाचा सोपी रेसिपी

उपचाराला दिरंगाई? आई-बाळाचा मृत्यू; ग्रामीण रुग्णालयावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT